Homeमहाराष्ट्रचाकणकरांच्या अनामिकेला दुखापत कशी झाली?:धायरीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा VIDEO शेअर करत फेटाळले...

चाकणकरांच्या अनामिकेला दुखापत कशी झाली?:धायरीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा VIDEO शेअर करत फेटाळले अंधारेंचे आरोप

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातच्या नादाला लागून तंत्रमंत्र विद्येसाठी आपली अनामिक कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आता रुपाली चाकणकर यांनी स्वतः धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या अनामिकेला दुखापत कशी झाली? हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, गाडीतून उतरताना बोट दरवाज्यात अडकल्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. भोंदू अशोक खरात व त्यांच्याशी संबंधित असलेल्या पुढाऱ्यांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. भोंदू खरात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यातच सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर तंत्रमंत्र विद्येचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आज एका पोस्टद्वारे सुषमा अंधारे यांचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी धायरीतील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काय महत्त्वाचे आहे या व्हिडिओत? या व्हिडिओत सदर मंडळाचा अध्यक्ष सांगत आहे की, रुपाली चाकणकर दरवर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात. गतवर्षीही त्या आरतीला आल्या होत्या. त्यावेळी गाडीतून उतरताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकले होते. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यांनी टिश्यू पेपरने जखम कोरडी करून त्यांनी गणपत्ती बाप्पांची आरती पूर्ण केली. हा संपूर्ण प्रकार आमच्या गणेश मंडळाच्या सीसीटीव्हीमध्येही दिसून येईल. चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरुपाचे असून, फोटोविषयी ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला आहे. चाकणकरांचा सुषमा अंधारेंवर हल्ला रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी सुषमा अंधारेंवर त्यांचे नाव न घेता जोरकसपणे टीका केली आहे. गेली 20-22 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना, जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली. वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे गत आठवड्यात चाकणकरांवर हल्ला चढवत म्हणाल्या होत्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे त्या म्हणाल्या होत्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!