Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ मिश्रण बनविणाऱ्या युनिटवर छापा:पती-पत्नी ताब्यात; 6 लाख 63 हजारांचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ मिश्रण बनविणाऱ्या युनिटवर छापा:पती-पत्नी ताब्यात; 6 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका युनिटवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांबेगाव येथील ‘चैतन्य फूड गोदाम’ येथे टाकलेल्या छाप्यात पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास दत्तात्रय मांढरे (वय 54) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय 54, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कैलास मांढरे हा अमली पदार्थ मिश्रित पावडर तयार करून पान आणि गुटखाजन्य पदार्थांमध्ये मिसळून विकत असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ‘चैतन्य फूड गोदाम’ येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रव स्वरूपातील अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, तसेच विविध मशीन आणि साहित्य असा एकूण 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 17(ब), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पहिल्यांदाच एका कंपनीने विकसित केलेल्या ‘ड्रग ॲनालाईझर किट’चा वापर करण्यात आला. या किटच्या मदतीने तपासणी केली असता, जप्त केलेल्या पदार्थांमध्ये अफिमसारख्या अमली पदार्थाचा अंश असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!