Homeदेश-विदेशहोर्मुझ येथून तेलाचे जहाज मुंबईत आले, युद्धानंतर भारतात प्रथमच, इराणशी तीन फेऱ्यांच्या...

होर्मुझ येथून तेलाचे जहाज मुंबईत आले, युद्धानंतर भारतात प्रथमच, इराणशी तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर सामुद्रधुनीतून बाहेर पडले


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • होर्मुझ येथून तेलाचे जहाज मुंबईत दाखल, युद्धानंतर भारतात प्रथमच, इराणशी तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर सामुद्रधुनीतून बाहेर पडले

मुंबई/नवी दिल्ली56 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

अमेरिका-इराण युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलाँग सुएझमॅक्स’ हे तेलवाहू जहाज सौदीतून कच्चे तेल घेऊन गुरुवारी मुंबई बंदरात दाखल झाले. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझ जलमार्गातून प्रवास करून भारतात आलेले हे पहिले जहाज आहे.

यात १.३५ लाख मेट्रिक टन कच्चे तेल असून ते पूर्व मुंबईतील माहूल येथील रिफायनरींना पाठवले जाईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांच्याशी होर्मुझमधून भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाबाबत संवाद साधला. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार होर्मुझमधून २० टँकर बाहेर काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, भारताकडे पुरेसा इंधन साठा आहे. सध्या ऐतिहासिक संकट आहे, असे आयईएने म्हटले.

इंडक्शन विक्रीमध्ये ९४% वाढ

आखातातील युद्धामुळे गॅसची टंचाई वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शहरी भागात सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची मुदत जाहीर केली होती. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस उत्पादन मंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी सांगितले की, आता ग्रामीण भागात एकदा सिलिंडर घेतल्यावर दुसरे सिलिंडर ४५ दिवसांनी नोंदवता येईल.

दरम्यान, भारतीय गॅस उत्पादक कंपन्यांनी परदेशात गॅस निर्यात करणे थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. दुसरीकडे इंडक्शन (विजेवर चालणारी शेगडी) विक्रीमध्ये ९४ टक्के वाढ झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय करारानुसार भारत नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमारला गॅस निर्यात करतो. ही निर्यात बंद करून भारतात पुरवठा वाढवावा. एस्मा कायद्यानुसार सरकारला निर्यातीत बदलाचे अधिकार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांत इंडक्शन विक्री वाढली आहे. अनेक ठिकाणी साठा संपल्याने नागरिक हैराण आहेत.

जळगाव: १५० पैकी ७० चटई उद्योग बंद पडणार

जळगाव|युद्धामुळे चटई निर्मितीस लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर ८०% वाढले. शहरातील १५० पैकी ७० चटई निर्मिती उद्योग आठवडाभरात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर सोलापुरात अक्कलकोट रोड, चिंचोली, होटगी रोड एमआयडीसीत फूड प्रोसेसिंग, फार्मा, फाँड्री, मेटल प्रोसेसिंगसह ९० उद्योगांतील उत्पादन गुरुवारी ठप्प झाले. ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय रमजानसाठी निर्यात होणारे २ कोटी रुपयांचे पापड पडून आहेत.

अमेरिकेला इशारा – आखात रक्ताने माखू..

इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिले वक्तव्य केले. गुरुवारी टीव्हीवरील अभिभाषणात खामेनी म्हणाले, आम्ही आक्रमकांच्या रक्ताने पर्शियन आखात लाल करू. शत्रूवर दबावासाठी सामुद्रधुनी बंद केली जाईल. या प्रदेशातील सर्व अमेरिकन तळ बंद करा. अन्यथा हल्ले सुरू राहतील. इराणला त्याच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत. ते फक्त त्यांच्या भूमीवरील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे आणि हे हल्ले सुरूच राहतील.

जहाजाचा ‘डार्क मोड’….

हे तेलवाहू जहाज १ मार्च रोजी सौदीच्या रास तनुरा बंदरातून १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन रवाना झाले. ८-९ मार्च रोजी जेव्हा हे जहाज युद्धग्रस्त होर्मुज जलमार्गाच्या सर्वात धोकादायक भागात पोहोचले, तेव्हा भारतीय कप्तानाने एक धाडसी निर्णय घेतला. जहाजाचे AIS ट्रान्सपाँडर बंद करण्यात आले. या ‘डार्क मोड’मुळे हे जहाज कोणालाही दिसत नव्हते, ना इराणी नौदलाला, ना ट्रॅकिंग एजन्सींना. हेच त्याच्या सुरक्षेचे सर्वात मोठे शस्त्र ठरले. होर्मुज ओलांडल्यानंतर १० मार्च रोजी हे जहाज पुन्हा ट्रॅकिंग सिस्टिमवर दिसले आणि १२ मार्च रोजी मुंबईच्या जवाहर बेटावर (बुचर आयलंड) स्थिरावले.

शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती…

  • इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही समावेश आहे. ही समिती आढावा घेईल.
  • मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेलचालकांनी ‘गॅस पुरवठा बंद आहे, त्यामुळे मेन्यू कार्डवरील सर्वच खाद्यपदार्थ उपलब्ध नाहीत.’ असे ग्राहकांना सांगणारे सूचना फलक ठळकपणे लावले आहेत. अशीच स्थिती राज्यभरात दिसत आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना बढती, नवीन करार मिळू शकतो, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या...

0
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी कर्क राशीच्या नोकरदार लोकांना बढतीचे योग आहेत. वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन करार, तर फ्रीलान्सर्सना नवीन प्रकल्प मिळू शकतो....

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!