कृषी व्यापार आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची कंपनी पल्सर इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आता आपल्या स्मार्ट ॲग्री सोल्यूशन्समध्ये आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारतीय शेती क्षेत्रात अचूक शेती आणि प्रगत पुरवठा साखळीचे नवे पर्व सुरू होणार आहे. महत्त्वाच्या घडामोडी आणि नफ्यातील मोठी झेप
कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. डिसेंबर 2025 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4 पटीने वाढून 3.29 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात 66 लाख रुपये होता. तसेच, कंपनीच्या महसुलात तब्बल 530 टक्क्यांची वाढ होऊन तो 39.64 कोटी रुपयांवर गेला आहे. 100 टक्के लाभांशाचा विचार
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दोन मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. AI आणि IoT विस्तार करण्यात येणार असून स्मार्ट ॲग्री सोल्यूशन अंतर्गत नवीन तंत्रज्ञान राबवण्यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचबरोबर कंपनी आपल्या राखीव निधीतून 100 टक्क्यांपर्यंत मध्यंतरी लाभांश देण्याची शिफारस करू शकते. यासाठी रेकॉर्ड डेट देखील याच बैठकीत जाहीर होईल. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर तंत्रज्ञान
आम्ही शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढवण्यासाठीच नाही, तर मालाची ने-आण, पारदर्शकता आणि साठवणुकीसाठी AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणार आहोत. यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पल्सर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद परमार यांनी दिली आहे. नुकताच पूर्ण झालेला राईट्स इश्यू
कंपनीने आपल्या विस्तार योजनांसाठी डिसेंबर 2025 मध्ये 35.70 कोटी रुपयांचा राईट्स इश्यू यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या निधीचा वापर कोल्ड स्टोअरेज उभारणी, कंत्राटी शेती आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. कंपनीचा इतिहास आणि विस्तार
सन 1991 मध्ये स्थापन झालेली पल्सर इंटरनॅशनल प्रामुख्याने ताजी फळे आणि भाजीपाला यांच्या प्रक्रिया आणि वितरणात कार्यरत आहे. गुजरातमध्ये कंपनीचे लॉजिस्टिक हब्स, वेअरहाऊस आणि प्रक्रिया युनिट्सचे मोठे जाळे आहे. आता AI आणि IoT च्या प्रवेशामुळे कंपनी कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज झाली आहे.
Source link
शेतीसाठी पल्सर इंटरनॅशनलचा मास्टर प्लॅन!:स्मार्ट ॲग्री सोल्यूशन्समध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करणार
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























