Homeमहाराष्ट्रराजकीय नेत्याकडून मुलीचे लैंगिक शोषण:आरोपी NCP नेत्याचा निकटवर्तीय, पोस्को अंतर्गत गुन्हा; वर्धा...

राजकीय नेत्याकडून मुलीचे लैंगिक शोषण:आरोपी NCP नेत्याचा निकटवर्तीय, पोस्को अंतर्गत गुन्हा; वर्धा जिल्ह्यातील संतापजनक घटना

वर्धा जिल्ह्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने अल्पवीयन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा पदाधिकारी 2022 पासून सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता असा आरोप आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दिवाकर गमे (78) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पूलगाव पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी 2022 मध्ये अवघ्या 17 वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तेव्हापासून तो तिचा लैंगिक छळ करत होता. 3 दिवसांपूर्वी त्याने पीडितेला अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून पुन्हा तिचा लैंगिक छळ सुरू केला. यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर पोलिसांकडे धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची बाबही समोर आली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार प्राप्त होताच 7 मार्च रोजी सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली. त्यांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला. त्यात आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दिवाकर गमे हा महाज्योती या संस्थेत काही वर्षांपूर्वी संचालक म्हणून कार्यरत होता. त्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी जवळचा संबंध असल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी दुसरीकडे, एका अनुसूचित जातीच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नंदुरबार नगरपालिकेचे सत्ताधारी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बाबा रिसॉर्ट येथे नुकताच चौधरी समाजाचा एक कार्यक्रम झाला होता. त्यात उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी सदर महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली होती. प्रथमेश चौधरी व गौरव चौधरी यांच्यावर 2 महिन्यांपूर्वीही ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. उपनगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हे ही वाचा… संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा:मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी
सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!