- मराठी बातम्या
- राष्ट्रीय
- तेलंगणाचे जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, 9 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या जाहीर
नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी
- लिंक कॉपी करा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रात्री देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल, नायब राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. आता जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आचार्य देवव्रत यांची जागा घेतील. देवव्रत गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार होता. देवव्रत यांची १५ सप्टेंबर २०२५ रोजी नियुक्ती झाली होती.
पश्चिम बंगालच्या राज्यपाल नियुक्तीवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “आश्चर्य आणि चिंता’ व्यक्त केली. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना कळवले होते की तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांना बंगालचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येईल. ममता म्हणाल्या, परंपरेनुसार या निर्णयापूर्वी माझा सल्ला घेण्यात आला नव्हता. निवडणुकीच्या तोंडावर राज्यपालांच्या राजीनाम्यामागे दबाव असू शकतो असा आरोपही त्यांनी केला. सी.व्ही. आनंद बोस यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर ममतांनी केंद्रावर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्यांदा राज्यपालांचा कार्यकाळ अपूर्ण राहिला आहे.
मूळचे त्रिपुराचे वर्मा राजघराण्यातील सदस्य
१५ ऑगस्ट १९५७ रोजी जन्मलेले आणि त्रिपुराच्या राजघराण्यातील सदस्य असलेले जिष्णू देव वर्मा ३१ जुलै २०२४ पासून तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. ते मूळ त्रिपुराचे रहिवासी आहेत. २०१८-२३ पर्यंत त्यांनी त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भाजपत प्रवेश केला. १९९३ मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. वर्मा कवी आणि लेखकही आहेत. त्यांचे “व्ह्यूज, रिव्ह्यूज अँड माय पोएम्स’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.























