राज्य शासनाने शिक्षकांच्या समायोजनाबाबत अलिकडेच जारी केलेले शासन निर्णय, शुध्दीपत्रक आणि त्यासंबंधीची इतर पत्रे ही पारदर्शक व वस्तुनिष्ठ नसल्याचा आरोप शिक्षक भारती व अ. भा. प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटनांच्या कृती समितीने लावला आहे. त्यामुळे शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी प्रक्रिया राबविली जावी, अशी मागणी आज, सोमवार, २ मार्च रोजी जि.प. सीईओ संजीता महापात्र यांच्याकडे करण्यात आली. या मागणीसाठी कृती समितीचे अनेक शिक्षक आज दुपारी जिल्हा परिषदेत गोळा झाले. जिल्हा परिषदेतर्फे दर महिन्याचा पहिला व तिसरा सोमवार हा तक्रार निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याअंतर्गत या शिक्षकांनी सीईओंची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी नोंदविली. मुळात शासनाने शिक्षक अतिरिक्त ठरविण्यासाठी नव्याने लागू केलेले नियमच चुकीचे आहे, अशी मांडणी यावेळी करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात मंजूर शिक्षकांची जेवढी संख्या आहे, त्याहून अधिक शिक्षक असल्यास ते अतिरिक्त ठरविण्यात यावेत, असा साधा तर्क आहे. परंतु विषयनिहाय व चुकीच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची संख्या निश्चित करुन मंजूर शिक्षकांपेक्षा कमी संख्या असतानाही त्या-त्या तालुक्यात शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रकार सुरु आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणारा आहे. शिक्षक अतिरिक्त ठरविल्यानंतर त्यांच्या समायोजनाचा मुद्दा आपसुकच पुढे येतो. मात्र जुन्या नियमानुसार निश्चिती केल्यास शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा व त्यानंतर त्यांचे समायोजन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्याने लागू करण्यात आलेली समायोजन प्रक्रिया रद्द करून त्या प्रक्रियेची वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि संदर्भीय शासन निर्णय, शुध्दीपत्रक आणि पत्रामध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार अविसंगत अशी पारदर्शक समायोजन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. यावेळी अ.भा. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक मंगेश खेरडे, दुसरे माजी संचालक मनोज चोरपगार, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण अळसपुरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर रामटेके, सरचिटणीस रविकिरण सदांशिव, सहसरचिटणीस विनोद वानखडे, संघटक सतिश डोंगरे आदी उपस्थित होते. एआयएसएफचा मोर्चा शिक्षकांना अतिरिक्त दाखवून शासन केवळ त्यांच्यावरच अन्याय करित नाही, तर अतिरिक्तच्या नावाखाली अनेक मराठी शाळा बंद करण्याचाही शासनाचा घाट आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) अलिकडेच जिल्हाकचेरीवर मोर्चा काढला होता. आजच्या शिक्षकांच्या आंदोलनामुळे त्या मोर्चाची आठवणही ताजी झाली आहे.
Source link
शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारी चुकीची संचमान्यता पद्धत थांबवा:शासनाच्या परिपत्रकावर शिक्षकांचा रोष, सीईओंना घातले साकडे
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























