अंजनगाव सुर्जी ते अकोट मार्गावरील भंडाराजजवळ मंगळवारी २४ फेब्रुवारी दुपारी कार, एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात ६५ वर्षीय कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले. मार्गातील वळणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारमधील सर्व एकाच कुटूंबातील असून, ते मुऱ्हादेवी येथे दर्शनासाठी जात होते. शालिकराम रामचंद्र वानरे (६५, रा. अकोट) असे मृतक कार चालकांचे नाव असून, कुसूम शलीकराम वानरे, प्रथमेष शालीकराम वानरे, उत्कर्षा प्रथमेष वानरे, सुमन गवई हे जखमी झाले . यांच्यासोबत बसमधील एक महिला प्रवासी जखमी आहे. वानरे कुटूंबिय अकोटवरुन सियाझ कारने अंजनगाव सुर्जीमार्गे मुऱ्हादेवी येथे दर्शनासाठी निघाले होते. मार्गातील भंडारज जवळ अंजनगावकडून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बससोबत कारची समारासमोर धडक झाली. अपघातस्थळापासून शंभर मीटर वर वळण आहे. या वळणामुळे वाहनं अनियंत्रीत झाले व एकमेकांवर जाऊन आदळले. या अपघातात कारचालक शालीकराम वानरे यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याचवेळी एसटी बसमधील काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार सुरज बोंडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातातील जखमींना अंजनगाव व अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये शालीकराम वानरे यांचा मुलगा प्रथमेष, पत्नी, सुन, सासू असे होते. प्रथमेष यांचा उत्कर्षा यांच्यासोबत पाच दिवसांपूर्वी विवाह झाला आहे. त्यामुळे शालीकराम वानरे व कुटूंबिय नवदाम्पत्याला घेऊन दर्शनासाठी मुऱ्हादेवी येथे जात होते मात्र तत्पुर्वीच शालीकराम वानरे यांच्यावर काळाने झेप घेतली. नवदाम्पत्याला घेऊन जात होते दर्शनासाठी
Source link
वळणामुळे कार-बसची धडक; एका जणाचा मृत्यू:पाच जखमी, भंडारज गावाजवळील दुर्घटना
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























