IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात रविवार 22 फेब्रुवारी रोजी सुपर 8 चा सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा (Team India) 76 धावांनी पराभव करून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला, एवढंच नाही तर यासोबतच संघाचा नेट रन रेट सुद्धा बराच खाली आला एवढा की आता टीम इंडियाला केवळ उर्वरित दोन सामने जिंकून चालणार नाही तर त्यांना नेट रन रेट (NRR) सुद्धा वाढेल अशी कामगिरी करावी लागेल. मात्र हे सगळं फक्त परफॉर्मन्सवर नाही तर काही अंशी नशिबावर सुद्धा अवलंबून असणार आहे.
टीम इंडियाचा नेट रन रेट निगेटिव्हमध्ये :
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 स्टेजमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेकडून फक्त पराभवच झाला नाही तर त्यांच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना सुद्धा धक्का बसलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी मोठा पराभव झाल्यावर टीम इंडियाचा नेट रन रेट आता -3.800 धावांपर्यंत खाली आलाय. तिथेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा नेट रन रेट हा +3.800 वर पोहोचलाय. ग्रुप 1 मध्ये आता भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता भारताला या दोन संघांविरुद्ध सामना जिंकावाच लागेल मात्र सोबतच नेट रन रेट सुद्धा सुधारावा लागेल. कारण जर पॉईंट्स बरोबरीवर असतील तर नेट रन रेटच्या आधारेच सेमी फायनलचं क्वालिफिकेशन होईल.
नेट रन रेट वाढवणार टेन्शन :
प्रत्येक संघाचा नेट रन रेट हा स्पर्धेत संघाने केलेल्या धावांना त्यांनी केलेल्या षटकांच्या संख्येने भागून मोजला जातो. मग विरोधी संघांविरुद्ध दिलेल्या धावांची सरासरी वजा केली जाते. जर संघ ऑल आउट झाला किंवा विरोधी संघ लवकर ऑल आउट झाला तर नेट रन रेटमध्ये मोठा फरक पडतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडियाला ऑल आउटचा सामना करावा लागला. ज्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट हा खूप जास्त खराब झालाय. भारताला आता सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने हे मोठ्या मार्जिनने जिंकावे लागतील.
हेही वाचा : IND VS SA मॅचमध्ये राडा, दोन्ही संघाचे स्टार खेळाडू मैदानात भिडले, अंपायरलामध्ये पडावं लागलं Video
कसा सुधारणार नेट रन रेट?
टीम इंडिया सुपर 8 मध्ये ग्रुप ए चा भाग आहे. यात आता टीम इंडियाचे दोन सामने हे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवले जातील. तेव्हा या दोन्ही सामन्यात 50 ते 70+ धावा किंवा 8 ते 10 विकेटने भारताला विजय मिळवावा लागेल. टीम इंडिया जर प्रथम गोलंदाजी करत असेल तर त्यांना विरोधी संघाला कमी स्कोअरवर थांबवावं लागेल, जसे 120 ते 140 धावांच्या खाली आणि विजयासाठी मिळालेल्या टार्गेटला सुद्धा लवकर कमी बॉलमध्ये पूर्ण करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन NRR सुधारू शकतो. जर भारताने उर्वरित सामन्यात प्रथम फलंदाजी केली तर त्यांना 200+ स्कोअर करावा लागेल आणि समोरच्या संघाला 150 धावांच्या खाली रोखावं लागेल. असं झाल्यास टीम इंडियाच्या नेट रन रेटला मोठा बूस्ट मिळेल आणि तो वाढू शकेल.
हेही वाचा : T20 World Cup 2026: पराभवानंतर ‘या’ योगायोगामुळे टीम इंडिया पुन्हा जिंकणार? जुळलेला ‘महासंयोग’ नक्की काय?
नशिबाची साथ सुद्धा गरजेची ठरणार :
टार्गेटचा पाठलाग करणं हे सहसा नेट रन रेट सुधारण्यासाठी अधिक फायदेशीर असतं, विशेषतः अशावेळी जेव्हा तुमच्या समोर तुलनेनं कमकुवत संघ असतो. अशावेळी टीम इंडियाला नशिबाची साथ सुद्धा लागणार असून जेणेकरून ते टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडतील. उदाहरणादाखल बोलायचं झाल्यास जर समोरच्या संघाने 120 धावा केल्या आणि भारताने तो स्कोअर 10 ओव्हरमध्ये चेज केला तर टीम इंडियाचा नेट रन रेट हा खूप वेगाने सुधारेल आणि ‘+’ मध्ये येईल. म्हणजेच आता टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात डोमिनेट करावं लागणार आहे. तेव्हा कुठे जाऊन टीम इंडिया साठी सेमी फायनलचं दार उघडेल.





























