Homeदेश-विदेशनोकरीच्या बातम्या नवीन कामगार कायद्यामुळे पगार वाढणार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

नोकरीच्या बातम्या नवीन कामगार कायद्यामुळे पगार वाढणार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ


नोकरीच्या बातम्या पगार वाढ: नोकरीच्या ठिकाणी प्रचंड मेहनतीनं काम केल्यानंतर नोकरदार वर्गाला अपेक्षा असते ती म्हणजे हातात येणाऱ्या पगाराची. बरीच मंडळी या पगाराच्या आकड्यावर समाधानी असतात. तर, काही मंडळी पगाराचा आकडा मोठा असला तरीही त्यामध्ये विविध तरतुदींमुळं होणाऱ्या कपातीनं नाराजीचा सूरही आळवतात. आता मात्र तसं होणार नाही. कारण, नोकरदारांच्या हाती येणारा पगार आता वाढणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पगारात होणार वाढ, पण कशी?

सबंध नोकरदार वर्गासाठी ही आनंदाची बातमी, कारण नव्या कायद्यामुळं वेतनात होणार मोठी वाढ होणार असून, देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी ही महत्त्वाची अपडेट असेल. अनेक दशकांपासून लागू असणाऱ्या आयकर नियमांमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

‘आयकर कायदा नियम मसुदा 2026’मुळे (ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स) नोकरदारांच्या (Salary Slip) सॅलरी स्लिपमधील अनेक गोष्टी बदलणार आहेत. जिथं नव्या नियमांमुळे करपात्र उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार अर्थात (टेक होम सॅलरी/ In Hand Salary) मोठ्या फरकानं वाढणार आहे.

कशी होणार पगारवाढ?

नव्या कायद्यामुळं मागील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मान्य करत सरकारने मुलांच्या शैक्षणिक भत्त्यात (Education Allounce) आणि वसतिगृह भत्त्यात (Hostel Allounce) मोठी वाढ प्रस्तावित आहे. एज्युकेशन अलाउन्स आणि हॉस्टेल अलाउन्समुळं पालकांना आयकरात मिळणारी सवलत होय असून, त्यात जास्तीत जास्त दोन अपत्यांसाठी ही सवलत घेता येते.

पगारवाढीचं गणित समजून घेताना…

समजा, अमुक एका व्यक्तिचं वार्षिक वेतन 30 लाख रुपये आहे. तर, जुन्या आणि नव्या नियमांनुसार त्याच्या वेतनातील फरक खालीलप्रमाणे असेल

तपशील
जुने नियम (1962)
नवे नियम (2026)
एकूण वजावट (डिडक्शन)
₹६,५९,६००
₹१०,८०,०००

करपात्र उत्पन्न
₹१९,३५,४००
15,07,000

मासिक पगार (हातात)
₹१,९५,६६२
₹२,०६,८०१





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!