Homeमहाराष्ट्रअकोल्यात हनुमान मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण:पैसे गोळा करण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड; ग्रामस्थ...

अकोल्यात हनुमान मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण:पैसे गोळा करण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड; ग्रामस्थ म्हणाले- हा आमच्या श्रद्धेचा भाग

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिराच्या कळसावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांसह 5 व 10 रुपयांच्या नाण्यांची मोठी उधळण करण्यात आली. या अजब प्रकारामुळे उधळलेले पैसे गोळा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने परिसरात काही काळ झुंबड उडाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण सुरू होताच त्या वेचण्यासाठी भाविकांनी एकच झुंबड उडवली, ज्यामध्ये काही जण थेट मंडपावर चढले तर काही वाऱ्यामुळे लांबवर उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसले. या धावपळीमुळे परिसरात काही काळ चेंगराचेंगरीची भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र या संपूर्ण सोहळ्यात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा आमच्या श्रद्धेचा भाग- ग्रामस्थ गावकऱ्यांनी या प्रकाराचे समर्थन करत याला आपल्या भक्तीचा भाग असल्याचे म्हटले असून, मिळवलेल्या नोटा आणि नाणी श्रद्धेपोटी आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार असल्याचे भाविकांनी सांगितले. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांतील अशा उधळणीच्या योग्यतेबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!