Homeदेश-विदेशस्पेस न्यूज हाऊ अमेरिका सीक्रेट नेवाडा एरिया 51 एलियन फोटो घेतले अंतराळवीर...

स्पेस न्यूज हाऊ अमेरिका सीक्रेट नेवाडा एरिया 51 एलियन फोटो घेतले अंतराळवीर नासा ट्रम्प ऑर्डर एलियन यूएफओ फाइल्स रिलीझ


जागतिक बातम्या: उडत्या तबकड्या, परग्रहवासी अर्थात एलियन…. या सर्व गोष्टी कितीही कल्पत वाटत असल्या किंवा अनेकांचा त्यावर विश्वास नसला तरीही अवकाश आणि त्याच्याशी संबंधित या संकल्पनांच्या अस्तित्वावर संशोधनांच्या माध्यमातून विविध सिद्धांतांच्या मदतीनं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. चित्रपटांच्या माध्यमातूनही या संकल्पना अधिक सोप्या करून दाखवण्या आल्या. एलियन, ही त्यापैकीच एक अतिशय कुतूहलाची गोष्ट. पृथ्वीपासून किबंहुना पृथ्वी आहे त्या आकाशगंगेपासून कैक मैल दूर असणाऱ्या कोणा एका दुसऱ्या विश्वात एलियनचं अस्तित्वं असल्याचं आजवर बऱ्याचदा सांगण्यात आलं. पुन्हा एकदा या विषयाला हवा मिळण्याचं कारण ठरत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जारी केलेले निर्देश.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

एरिया 51, एलियन आणि उएफओ म्हणजेच उडत्या तबकड्यांबाबतची रहस्य सांगणारी माहिती आणि दस्तऐवज जारी करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले. ज्यामुळं पुन्हा एकदा अमेरिका जगापासून नेमकं काय लपवू पाहत आहे, हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे.

परग्रहांवरील अंतराळ यानांमध्ये कितपत तथ्य?

अवकाशात किंवा काही प्रसंगी आकाशत उडताना दिसणाऱ्या UFO सम गोष्टी कैक दशकांपासून अनेकांची उत्सुकता शिगेला नेताना दिसत आहेत. अमेरिकी सरकारनंही या विचित्र आकाराच्या यानांचं संशोधन करत काही अहवालांच्या आधारे निरीक्षणं केली. अनेकदा सांगण्यात आलं की, ही कोणत्या गोपनीय विमानाची चाचणी होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या आदेशानंतर कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

एरिय़ा 51 नं वेधलं जगाचं लक्ष

बराक बामा यांनी एरिया 51 मध्ये एलियन नाही, असं वक्तव्य एका मुलाखतपर कार्यक्रमात केलं आणि यानंतर Google वर सर्वांनीच एरिया 51 बाबतची माहिती शोधण्यासाठी धाव घेतली. माहितीसाठी, अमेरिकेत नेवाडा नावाचा एक प्रांत आहे. येथील वाळवंटामध्ये अमेरिकेच्या वायुदलाचा एक गुप्त तळ आहे. उपलब्ध माहितीनुसार इथं काही गोपनीय मोहिमांवरील कामं, अतिशय अद्ययावत लढाऊ विमानांच्या चाचण्या होतात. गुगल मॅपमध्ये एरिया 51 सर्च केलं असता एक दृश्य दिसतं, ज्यामध्ये एका तलावापाशी असणारा पर्वतीय भाग नजरेस पडतो आणि काही बांधकाम दिसतं.

स्पेस न्यूज हाऊ अमेरिका सीक्रेट नेवाडा एरिया 51 एलियन फोटो घेतले अंतराळवीर नासा ट्रम्प ऑर्डर एलियन यूएफओ फाइल्स रिलीझ

1955 पासून कार्यरत असणाऱ्या या सुविधेमध्ये यू 2 आणि एसआर 71 ब्लॅकबर्ड अशा विमानांची चाचणीसुद्धा करण्यात आली आहे. याच तळाबाबत एलियन तंत्रज्ञान आणि उडत्या तबकडीचे सिद्धांतसुद्धा मांडण्यात येतात.

अमेरिका हे ठिकाण जगापासून का लपवतंय?

ओबामांनी जाहीरपणे वक्तव्य करत इथं कोणतीही भूमिगत सुविधा नसल्याचं सांगितलं. काही काळापूर्वी एरिया 51 हा भाग एका वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या माहितीरपटात दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये CIA च्या गोपनीय कागदपत्रांनुसार हा कोणताही तळ नसून, एक प्रयोगशाळा आहे. 1968 मध्ये इथं अनेक घातक विमानांची चाचणी घेण्यात आली होती. इथंच अमेरिकी वैमानिकांना रशियाशी संघर्ष झाल्यास डॉगफाईटमध्ये कसा लढा द्यावा याचं प्रशिक्षणही दिल्याचं सांगण्यात येतं. मात्र नेवाडामध्ये ननेमकं काय सुरुय याची माहिती कोणाला मिळू नये यासाठी काही अंतरावरील तळही बंद करण्यात आले.

स्पेस न्यूज हाऊ अमेरिका सीक्रेट नेवाडा एरिया 51 एलियन फोटो घेतले अंतराळवीर नासा ट्रम्प ऑर्डर एलियन यूएफओ फाइल्स रिलीझ

अनावधानानं टीपलेल्या एका फोटोनं वाढवला गुंता

अमेरिकेनं जे रहस्य कैक वर्षांपासून लपवलं होतं ते जवळपास जगासमोर उघड होता होता राहिलं. मात्र, तिथं काहीतरी मोठी गोपनीय गोष्ट आहे याचा मात्र उलगडा झाला आणि तोसुद्धा अंतराळवीरांच्या एका चुकीमुळं. 1974 मध्ये स्कायलॅब्सच्या काही अंतराळवीरांनी अनावधानानं एरिया 51 चे फोटो टीपले आणि हे ठिकाण प्रकाशझोतात आलं. पुढं अमेरिकी वायुदलानं हा भाग ताब्य़ात घेतला.

स्पेस न्यूज हाऊ अमेरिका सीक्रेट नेवाडा एरिया 51 एलियन फोटो घेतले अंतराळवीर नासा ट्रम्प ऑर्डर एलियन यूएफओ फाइल्स रिलीझ

2024 मध्ये पेंटागनच्या एका जाहीर अहवालात सांगितल्यानुसार, 1950 आणि 60 च्या दशकामध्ये इथं अनेक गोपनीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाची विमानं पाहायला मिळाली. मात्र, याचा दुसऱ्या विश्वातील तबकड्यांशी कोणताही संबंध नाही. आजही या रहस्याबाबत अनेक सिद्धांत मांडले जात असल्यानं आता नव्या दस्तऐवजांतून नेमका कोणता उलगडा होतो, इथं खरंच एलियनचं अस्तित्वं आहे का, याचा खुलासा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!