Homeमनोरंजनपरिक्षा केंद्रवारच प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयातून पूर्ण केला गणिताचा पेपर; अकोल्यातील घटना

परिक्षा केंद्रवारच प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयातून पूर्ण केला गणिताचा पेपर; अकोल्यातील घटना


अकोला वार्ता: महाराष्ट्रभर नुकत्याच दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी अगदी मन लावून परीक्षेसाठी वर्षभर तयारी करत असतात. चांगले गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. दरम्यान अकोल्यातली मूर्तिजापूर शहरात एका विद्यार्थीनीच्या जिद्दीचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले आहे. परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थीनीला अचानक भोवळ आली मात्र, तरीही तिने तिचा गणिताचा पेपर दिला. तिच्या या जिद्दीची खरच दाद दिली पाहिजे, सर्व विद्यार्थांसाठी ती एक प्रेरणादायी उदाहण बनली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं काय घडलं?

गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली. श्रेया देशमुख असे या विद्यार्थिनीचे नाव असून घटनेनंतर विद्यालय प्रशासनाने तत्काळ तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अचानक तब्येत बिघडल्याने श्रेयाचा गणिताचा पेपर अपूर्ण राहणार की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पेपर राहिल्याची खंत तिच्याही मनात होती.

थेट रुग्णालयातून दिला पेपर

प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिने आपला गणिताचा पेपर पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यालय प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व विशेष परवानगी मिळवली. डॉक्टरांनी तपासणी करून विद्यार्थिनीची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली श्रेयाने थेट रुग्णालयातूनच आपला गणिताचा पेपर पूर्ण केला. विद्यार्थिनीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या चिकाटीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

5000 हुन जास्त केंद्रांवर परिक्षा सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून ती 18 मार्च 2026 रोजी संपणार आहे. हे वेळापत्रक पुणे, नागपूर आणि मुंबईसह सर्व 9 विभागीय मंडळासाठी लागू केले गेले आहे. या परीक्षेसाठी राज्यभारातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांची नोंदणी केली गेली आहे. राज्यभरातील 5,111 केंद्रांवर या परीक्षा पार पाडल्या जात आहेत. या परीक्षेतील पहिला भाषाविषयक पेपर होता. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी बहुकौशल्य सहाय्यक तंत्रज्ञ, कृषी, यांत्रिक तंत्रज्ञान अशा विविध व्यावसायिक विषयांचे पेपर झाले. त्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पेपर वेगवेगळ्या विषयाच्या सुरु आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर माध्यमांचे विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

अलीकडील 12 वीच्या परिक्षेतील दुर्घटना

महाराष्ट्रात अलीकडेच 10 वीच्या परिक्षा सुरु झाल्यात तर काही दिवसांपूर्वीच 12 वीच्या परिक्षाही सुरु झाल्या होत्या. दरम्यान 12 वीच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधील अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेच जास्त ताण न घेत योग्य काळजी घेऊन परिक्षा घेण्याचं आवाहन केलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!