Homeमनोरंजनwhatsapp ग्रुप मेसेज इतिहास नवीन फीचर अपडेट बातम्या तंत्रज्ञान बातम्या मराठीत

whatsapp ग्रुप मेसेज इतिहास नवीन फीचर अपडेट बातम्या तंत्रज्ञान बातम्या मराठीत


Whatsapp नवीन फीचर: व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी लवकरच एक खास बदल येणार आहे. ग्रुपमध्ये उशिरा जॉईन झालेल्या व्यक्तीला आधी काय चर्चा झाली हे समजत नसल्याने वारंवार “काय चाललंय?” असा प्रश्न विचारावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी कंपनी नवीन सुविधा आणत आहे. या फीचरमुळे नव्या सदस्याला मागील काही महत्त्वाचे मेसेज एकाच वेळी पाहता येतील. त्यामुळे ग्रुपमधील संवाद अधिक स्पष्ट आणि सोपा होईल. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे वापरकर्त्यांच्या नियंत्रणात असेल आणि गोपनीयतेबाबतही कंपनीने सुरक्षिततेचा दावा केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ग्रुपमध्ये येणाऱ्या नव्या मेंबरला मोठी मदत

नवीन ‘Group Message History’ फीचरमुळे ग्रुपमध्ये नुकतेच सामील झालेल्या सदस्याला मागील 25 ते 100 पर्यंत अलीकडील मेसेज पाठवता येणार आहेत. हे मेसेज अॅडमिन किंवा ग्रुपमधील मेंबर निवडून शेअर करू शकतात. त्यामुळे नवीन व्यक्तीला आधी काय चर्चा झाली, कोणता निर्णय घेतला किंवा कोणत्या विषयावर बोलणं सुरू आहे हे लगेच कळेल.

हे मेसेज साध्या चॅटमध्ये मिसळून दिसणार नाहीत. ते स्वतंत्र स्वरूपात दिसतील, त्यात पाठवणाऱ्याचे नाव आणि वेळ (timestamp) स्पष्ट असेल. त्यामुळे गोंधळ होणार नाही आणि संभाषण समजायला सोपं जाईल.

गोपनीयता आणि नियंत्रण युजर्सकडे

ही सुविधा स्वयंचलित नसणार आहे. म्हणजेच प्रत्येक वेळी हिस्ट्री शेअर करण्याचा निर्णय ग्रुप अॅडमिन किंवा मेंबर स्वतः घेऊ शकतो. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन कायम राहणार असल्याने वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील असा दावा करण्यात आला आहे.

ग्रुप अॅडमिनला हे फीचर पूर्णपणे बंद करण्याचाही पर्याय मिळणार आहे. मात्र गरज पडल्यास अॅडमिन स्वतः नवीन सदस्याला मेसेज हिस्ट्री पाठवू शकतो. जेव्हा अशी हिस्ट्री शेअर केली जाईल तेव्हा ग्रुपमधील इतर सदस्यांना त्याची नोटिफिकेशन मिळेल.

कुटुंब, काम आणि इव्हेंट प्लॅनिंगसाठी उपयोगी

आज अनेक लोक ऑफिस काम, कुटुंब, मित्र किंवा सोसायटीसाठी ग्रुप चॅटवर अवलंबून असतात. मिटिंग्स, कार्यक्रम, ट्रिप प्लॅनिंग किंवा सूचना देताना अनेक महत्त्वाचे मेसेज राहून जातात. या नव्या फीचरमुळे समन्वय सुधारेल आणि वारंवार माहिती पुन्हा सांगण्याची गरज कमी होईल.

एकूणच, व्हॉट्सअॅपचा हा बदल ग्रुप कम्युनिकेशन अधिक व्यवस्थित आणि वेळ वाचवणारा ठरण्याची शक्यता आहे. नवीन सदस्यासाठी सुरुवातीचा गोंधळ कमी होईल आणि ग्रुपमधील चर्चा अधिक सुटसुटीतपणे पुढे जाईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!