Homeमनोरंजनरेवती लेलेच्या आयुष्यातील नवी इनिंग; थाटातमाठात झालं लग्न, ‘अहों’ची करून दिली खास...

रेवती लेलेच्या आयुष्यातील नवी इनिंग; थाटातमाठात झालं लग्न, ‘अहों’ची करून दिली खास ओळख | मनोरंजन News in Marathi


मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री रेवती लेले हिने आज आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. पुण्यात पारंपरिक मराठमोळ्या थाटामाटात तिचा विवाहसोहळा संपन्न झाला. रेवतीनं कौशिक भिडे याच्यासोबत लग्नगाठ बांधत नव्या जीवनप्रवासाला सुरुवात केली आहे. लग्नाचे देखणे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

गुप्त ठेवलेला जोडीदार अखेर समोर

काही दिवसांपूर्वी रेवतीनं सोशल मीडियावर साखरपुड्याची अंगठी दाखवत प्रेमात असल्याची कबुली दिली होती. मात्र होणाऱ्या पतीबद्दल तिनं कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. त्यामुळे तिचा लाइफ पार्टनर नेमका कोण, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर लग्नानंतर कौशिक भिडे यानं स्वतः त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “हे यू” असं कॅप्शन देत त्यानं आनंद व्यक्त केला, तर रेवतीनं त्यावर “हॅलो हसबंड” अशी प्रेमळ कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गोड संवादामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कौशिक भिडे नेमका कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, तो मनोरंजनविश्वाशी संबंधित आहे का, याबाबत सध्या चर्चा रंगली आहे. मात्र या नवदांपत्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अधिक माहिती अद्याप उघड केलेली नाही.

पारंपरिक लूकमध्ये खुललेलं सौंदर्य

रेवतीच्या लग्नातील पारंपरिक लूकनं विशेष लक्ष वेधलं. पिवळ्या रंगाची आकर्षक साडी, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या, गळ्यात दागिने आणि हातात हिरवा चुडा अशा अस्सल मराठमोळ्या साजात ती अत्यंत देखणी दिसत होती. साधेपणातही उठावदार असा हा लूक चाहत्यांना भावला. कौशिकनं लाल आणि पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. दोघांची जोडी अत्यंत सुंदर आणि साजेशी दिसत असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

रेवतीच्या या आनंदाच्या क्षणी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तिच्या सहकलाकारांनी आणि मित्रपरिवाराने नवदांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. चाहत्यांनीही “नांदा सौख्यभरे”, “खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स करत या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

करिअरची यशस्वी वाटचाल

रेवती लेले हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. ‘स्वामिनी’ मालिकेतील रमाबाई पेशवे या भूमिकेतून ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील तिची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी विशेष दाद देत गाजवली. नुकतीच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही तिची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मराठीबरोबरच तिनं हिंदी मालिकांमध्येही काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

व्यावसायिक आयुष्यात यशाची शिखरं गाठल्यानंतर आता रेवतीनं वैयक्तिक आयुष्यातही नवी इनिंग सुरू केली आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात ती कोणत्या नव्या प्रकल्पातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा शर्माचे त्वचेचे नमुने जिम बेल्टवर सापडले:दिल्ली एम्सने 11 पानांचा फॉरेन्सिक अहवाल सीलबंद लिफाफ्यात...

0
भोपाळमध्ये अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यूच्या तपासात एक महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू समोर आला आहे. सूत्रांनुसार, एम्स दिल्लीच्या पाच सदस्यीय वैद्यकीय मंडळाने आपला अंतिम फॉरेन्सिक...

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!