Homeमहाराष्ट्रपुणे पोलिसांवर आरोप बुधवार पेठेत कारवाई करताना अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेतले

पुणे पोलिसांवर आरोप बुधवार पेठेत कारवाई करताना अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेतले


पुणे पोलिसांनी बुधवार पेठ येथून अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत 11 फेब्रुवारीला मोठी कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी बांगलादेशी महिलांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन राबवत कारवाई केली होती. या कारवाईत 11 बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान यावेळी चार अल्पवयीन मुलींना देहविक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नसतानाही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पोलिसांनी बुधवार पेठेत राहणाऱ्या चार अल्पवयीन मुलींना त्यांचा देहविक्री व्यवसायसाठी कुठलाही संबंध नसतानाही कारवाई केली आहे. यामध्ये एका दहावीमध्ये शिकणाऱ्या कराटेपटूला वेश्या व्यवसाय करते म्हणून तिच्यावर कारवाई केल्याचा आरोप मुलीच्या आईने आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. मुलीची आई पुण्यातील मर्जी गल्लीत राहायला आहे.

मुलीच्या आईने या ठिकाणी कोणताही देहविक्री व्यवसाय सुरू नसताना, मी माझ्या मुलांसोबत रात्री झोपेत असताना पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी माझ्या मुलांना ताब्यात घेऊन देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत उभं केलं. तिच्यावर अल्पवयीने म्हणून कारवाई केली.

मुलगी शाळेत शिकत असलेल्या शाळेतही पुणे पोलीस वर्दीत गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या सगळ्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

18 फेब्रुवारीलाही पोलिसांची कारवाई

बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी पुणे शहरात कारवाई केली. बुधवार पेठ परिसरात अवैध वास्तव्य आणि देहविक्रय व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन करुन धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या छापेमारीत 22 महिलांना ताब्यात घेतलं असून यात 11 बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या टीपनंतर हे सर्च ऑपरेशन करण्यात आले.

या 11 बांगलादेशी महिलांना बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे या महिलांवर अनधिकृपणे कुंटणखान्यांमध्ये काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

यापूर्वीही पुणे पोलिसांनी 11 फेब्रुवारीला बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं. ही कारवाई मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान 41 इमारती आणि गल्लीबोळांमध्ये करण्यात आली होती. या परिसरात पोलिसांनी एका जागेचा शोध घेतला होता. या कारवाई दरम्यान 700 हून अधिक नागरिकांची चौकशी केली गेली होती.

या कारवाई पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांसह चार अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. एवढंच नाही तर 7 ग्रॅम चरस तसंच नशेची इंजेक्शन्स जप्त केले होते. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, अवैध स्थलांतर, मानव तस्करी आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.   दरम्यान बुधवार पेठेतील 11 बांगलादेशी महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर संबंधित महिलांवर तसंच कुंटणखाना चालवणाऱ्यांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!