Homeमहाराष्ट्रझिरवळांच्या कार्यालयातील व्यवहाराच्या स्टिंगचा धक्कादायक व्हिडिओ:एक लाईन 50 हजार, दोन लाईन 1...

झिरवळांच्या कार्यालयातील व्यवहाराच्या स्टिंगचा धक्कादायक व्हिडिओ:एक लाईन 50 हजार, दोन लाईन 1 लाख मंत्रालयातील लाचखोरीचा कोड उघड

मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्याला 35 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्टिंगच्या माध्यमातून उघड झालेल्या या प्रकरणात पैशांच्या व्यवहारासाठी खास ‘लाईन’चा गुप्त संकेत वापरला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे स्टिंग करणारे निर्मल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घडामोडी सांगितल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, विभागात येणाऱ्या फाईल्सवर लाल किंवा हिरव्या पट्ट्या मारून त्यावर एक किंवा दोन रेघा ओढल्या जात. या रेघाच व्यवहाराचा संकेत असत. एक लाईन म्हणजे 50 हजार रुपये, तर दोन लाईन म्हणजे 1 लाख रुपये, असा कोड असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेत मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव डॉ. रामदास गाडे आणि लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कथित व्हिडिओ देखी पहा… निर्मल शर्मा यांनी स्वतःच्या अनुभवाचा तपशील दिला. त्यांच्या मेडिकल दुकानात काही त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले. दुकानात स्वच्छता नव्हती, तसेच औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएस ठेवले होते. या कारणांवरून त्यांचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. हा आदेश त्यांना मान्य नव्हता म्हणून त्यांनी 7 तारखेला मंत्रालयात जाऊन अपील दाखल केले. अपीलची नोंद संगणकात करण्यात आली आणि 13 तारखेला सुनावणीची तारीख देण्यात आली. सुनावणीच्या दिवशी ते कार्यालयात गेले असता त्यांना डॉ. रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसवण्यात आले. त्यांच्या बाजूला राजेंद्र ढेरिंगे होते. ढेरिंगे यांनी प्रकरणाची माहिती गाडे यांना दिली. त्यानंतर गाडे यांनी फाईल नीट न पाहताच त्यावर दोन लाईन मारल्या आणि राजू यांचं काय ते तुम्ही बघून घ्या, असे म्हटल्याचा आरोप आहे. यानंतर ढेरिंगे यांनी त्यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यात एक लाख वरच्या अधिकाऱ्यांसाठी आणि दहा हजार स्वतःसाठी असल्याचे सांगितले गेले, असा दावा करण्यात आला. शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी विनंती केल्यानंतर 50 टक्के सवलत देण्यात आली आणि 55 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. त्यापैकी 2 हजार रुपये ऑनलाईन देण्यात आले आणि 53 हजार रुपये रोख दिले. एका व्हिडिओत ढेरिंगे यांनी आम्हाला वरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात, असे म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. सुनावणी गाडे यांनी घेतली होती आणि त्या वेळी मंत्री कार्यालयात नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर 21 तारखेला ते पुन्हा मंत्रालयात गेले असता मंत्री झिरवळ कार्यालयात होते. त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटू दिले नाही. उलट पुन्हा ढेरिंगे आणि गाडे यांच्याकडे पाठवले. व्हिडिओमध्ये गाडे दरवाजा उघडताना दिसत असून, तुझी खूप चर्चा आहे, तुझ्यासाठी मला खूप फोन आले, असे ते म्हणाल्याचा दावा आहे. शर्मा यांनी मुख्यमंत्री कार्यालयात गाडे यांच्याविरोधात तक्रार दिल्याचेही सांगितले. मंत्रालयात येणाऱ्या 90 टक्के लोकांकडून पैसे घेतले जातात निर्मल शर्मा यांच्या मते, मंत्रालयात येणाऱ्या सुमारे 90 टक्के लोकांकडून पैसे घेतले जातात आणि त्याशिवाय काम होत नाही. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात फक्त रामदास गाडे आणि राजेंद्र ढेरिंगे यांनाच पाहिले आहे. इतर कोणाचा सहभाग आहे की नाही, याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून एसीबीच्या कारवाईनंतर पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!