Homeदेश-विदेशचार वर्षाच्या भाचीला टाकीत बुडवून मारलं अन्... नंदेचा भयनक कट उघडकीस, हत्याप्रकरणानं...

चार वर्षाच्या भाचीला टाकीत बुडवून मारलं अन्… नंदेचा भयनक कट उघडकीस, हत्याप्रकरणानं खळबळ


गुन्हे अद्यतने: वहिनी ही एका प्रकारे दुसरी आईच असते. मात्र अलीकडेच या नात्याला काळिमा फासणारं प्रकरण उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बसी कलां या गावात निर्मळ नातेसंबंधांना हादरवणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध होत असल्याने संतापलेल्या 25 वर्षांच्या तरुणीने घरातच भयंकर कट रचल्याचा आरोप आहे. एका रात्री अचानक संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ उडाली. सुरुवातीला घरात चोरी किंवा बाहेरून हल्ला झाल्याची चर्चा होती. मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतशी घटना वेगळ्याच दिशेने वळली. अखेर काही तासांतच या प्रकरणामागील सत्य समोर आले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

प्रेमसंबंधातून सुरू झाला वाद
पोलीस माहितीनुसार बसी कलां गावातील आना (25) हिचे त्याच गावातील आदिल नावाच्या युवकासोबत सुमारे 2 वर्षांपासून संबंध होते. कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. तरीही दोघे संपर्कात राहात होते. आना हिची वहिनी फिरदौस वारंवार तिला समज देत असे. यामुळे घरात तणाव वाढत गेला आणि नंदेच्या मनात राग साचत गेला.

कुटुंबाला नशा देऊन बेशुद्ध केले
सोमवारी रात्री आनाने परिसरातील एका ओळखीच्या तरुणाकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. जेवणासाठी बनवलेल्या चिकन आणि दुधात तिने त्या गोळ्या मिसळल्या. कुटुंबातील सर्वांनी ते खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वजण बेशुद्ध पडले. घर शांत झाल्यावर आनाने 4 वर्षांच्या भाचीला उचलून छतावरील पाण्याच्या टाकीत टाकले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

यानंतर तिने झोपलेल्या वहिनी फिरदौस यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आनाने घरात दरोडेखोर घुसल्याची बनावट कथा सांगत आरडाओरडा केली. परिसरातील लोक जमा झाले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

3 तासांत पोलिसांनी उलटला नंदेचा कट
घटनेची माहिती मिळताच SSP संजय वर्मा पथकासह घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान आनाच्या बोलण्यात विसंगती आढळली ती जरा अडखळत होती चुक . चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि फिरदौस यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी अवघ्या 3 तासांत प्रकरणाचा उलगडा करत आना हिला अटक केली. घटनास्थळावरून वापरलेला चाकू आणि नशेच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर संपूर्ण बसी कलां गावात भीती आणि चर्चेचे वातावरण पसरले असून नात्यांमधील कटुता किती टोकाला जाऊ शकते याचीच चर्चा सुरू आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!