Homeदेश-विदेशसोन्याचांदीच्या भावात आज १७ फेब्रुवारीच्या रात्री घसरण, १८ फेब्रुवारी महाराष्ट्र मुंबई, पुणे,...

सोन्याचांदीच्या भावात आज १७ फेब्रुवारीच्या रात्री घसरण, १८ फेब्रुवारी महाराष्ट्र मुंबई, पुणे, नागपूर सोन चंडी आज चा भव अपडेटेड सोन्याचा दर


17 फेब्रुवारीच्या रात्री सोन्या चांदीच्या दरात घसरण सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या किंमतीमध्ये घट होऊन चांदी 2.26 लाख रुपये किलोपर्यंत पोहचली असून सोन्या दरांमध्येही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. दरांमध्ये झालेले हे बदल मल्टी कमोडिटी मार्केट म्हणजेट एमसीएक्सवर पाहायला मिळत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कितीने पडले सोन्याचे दर?

मंगळवारी रात्री एमसीएक्सवर 5 मार्चच्या वायद्यासाठी चांदीची किंमत 5.58 टक्क्यांनी घसरली. म्हणजेच प्रती किलो 13 हजार 378 रुपयांनी घरसण होऊन चांदी 2 लाख 26 हजार 513 रुपयांवर आली. त्याचप्रमाणे 2 एप्रिलच्या वायद्यासाठी सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. 10 ग्राम सोन्याची किंमत बाजारपेठेत 3 हजार 796 रुपयांनी म्हणजेच 2.45 टक्क्यांनी घसरली. सोनं 1 लाख 50 हजार 964 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचलं आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे.

चांदीच्या दरांमध्ये 1.93 लाखांची घसरण तर सोन्याच्या दरांमध्ये…

29 जानेवारी रोजी सोनं आणि चांदीच्या दरांनी विक्रमी स्तर गाठला होता. चांदीने 4 लाख 20 हजार रुपये प्रती किलोपर्यंत उडी घेतली होती. मात्र आता या दरांमध्ये तब्बल 1.93 लाख रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे सर्वोच्च दर 1 लाख 93 हजारांवर पोहचले होते. हे दर आज 43 हजारांहून अधिकने स्वस्त झाल्याचं दिसत आहे.

अंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत

17 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्पॉट प्राइज प्रती औंस 4920 ते 4950 अमेरिकी डॉलर्सदरम्यान होती. तर चांदीचा दर प्रती औंस 74 ते 75 अमेरिकी डॉलर्स इतका होता. मंगळवारी झालेल्या पडझडीमुळे सोनं आणि चांदीचे दर या आठवड्याभरातील सर्वात खालच्या स्तराला पोहोचले आहेत. डॉलर अधिक मजबूत झाल्याने ही पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे.

ईटीएफमध्येही दिसू शकते पडझड

शेअर बाजाराच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक पडझड झाल्याने बुधवारी शेअर बाजारामध्ये सोनं-चांदी ईटीएफच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. मंगळवारीही सोनं-चांदीच्या ईटीएफमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी सोनं-चांदीच्या ईटीएफचे दर 3 टक्क्यांनी पडले. विक्रमी दरांवरुन पडलेल्या दरांचा विचार केला तर चांदीच्या ईटीएफमध्ये 40 टक्क्यांची पडझड झाली आहे. तर सोन्याच्या ईटीएफमधील घसरण ही 18 टक्क्यांची आहे.

(टीप – सोनं, चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. येथील माहिती समान्य आकडेवारीवर अवलंबून असून ‘झी 24 तास’ कोणत्याही प्रकारे कोणालाही प्रोमोट करत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!