फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर असून ते सध्या मुंबईत आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात लोकभवनात बैठक झाली. परंतु, तत्पूर्वी मुंबईत इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मोठ-मोठे बॅनर लावले आहेत. बॅनरबाजीवर तर चर्चा झालीच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यावरून खोचक टीकाही केली. मात्र, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याच बॅनरमधली वेगळी बाजू समोर आणत सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुषमा अंधारे यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागताच्या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही फोटो लावले आहेत. परंतु, सुनेत्रा पवार यांच्या फोटोचा आकार लहान ठेवला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. याच मुद्द्यावरून अंधारे यांनी भाजप-महायुतीवर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले, मुंबईमध्ये आज फ्रान्सचे राष्ट्र प्रमुख येणार या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केली आहे. पण आजवर मुख्यमंत्री आणि त्यानंतर थोड्या कमी मात्र सारख्या उंचीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असायचे. मात्र आज लावलेल्या बॅनरमध्ये नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा वहिनी यांचा फोटो आकाराने छोटा का लावला गेला? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, हे बॅनर शाहसेनेने लावले असल्याचे कळते. शाह सेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनेत्रा वहिनींचा फोटो लहान करून नेमके काय दाखवायचे आहे. महिला म्हणून श्रीमती पवार यांचे अवमूल्यन करायचे आहे की पदसोपांपरंपरेमध्ये मी दुसरा आणि पवार तिसऱ्या असे सांगायचे आहे? असा प्रश्न अंधारे यांनी केला आहे. इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना मुंबई-ठाण्यात स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का?- संजय राऊत दरम्यान, मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लागलेल्या बॅनरबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे. इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना मुंबई-ठाण्यात स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? त्यांच्या बॅनरने पूर्ण मुंबई रंगवून ठेवली आहे, असे म्हणत त्यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परदेशी नेते येतात आणि जातात, त्यात स्थानिक राजकारण्यांचा काय संबंध, असा सवालही त्यांनी केला. ही येड्यांची जत्रा आहे, असे शब्द वापरत त्यांनी या सर्व प्रकारावर टीका केली.
Source link
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबईत बॅनरबाजी:सुनेत्रा पवारांचा फोटो लहान का? सुषमा अंधारेंनी वेधले उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवर लक्ष
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























