केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या चित्रपटामुळे संघाचे काम आणि विचार अधिक चांगल्या प्रकारे समजतील. नितीन गडकरी म्हणाले की, स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की संघाबद्दल लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे आणि प्रत्यक्ष वास्तव यात फरक आहे. त्यामुळे संघाचे विचार, त्याग, समर्पण आणि देशभक्ती जवळून समजून घ्या. आदिवासी भागातील सेवा कार्य, सहकार चळवळ, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम अशा अनेक कामांचा मोठा पट या माध्यमातून दिसेल. देशाच्या प्रगतीत संघाचा मोठा वाटा आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन संघ समजून घ्यावा आणि त्याची विचारधारा जाणून घ्यावी. हा चित्रपट जरूर पाहा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या १०० वर्षांत संघाने लाखो तरुणांना देशभक्तीची प्रेरणा दिली आहे. मी देखील त्या स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा मला अभिमान आहे. आज आपण १०० वर्षांचा टप्पा गाठला असला तरी काम अजून पूर्ण झालेले नाही. भारताला जगात अग्रस्थानी नेणे हे आपले ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देश सर्वोच्च स्थानी पोहोचावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. हिंदुत्वाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपण दलित, वंचित आणि गरिबांच्या उन्नतीसाठी काम करतो. हिंदुत्व हे जातीय किंवा सांप्रदायिक नाही. ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ती एक जीवनशैली आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात. आपली भारतीय ओळख ही आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेतून तयार झाली आहे. हीच प्रेरणा संघाने दिली आहे. २० फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाचा विचारप्रवास, सामाजिक उपक्रम आणि देशसेवा यांचा आढावा घेतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Source link
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन; म्हणाले – स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा अभिमान
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























