अरविंद मफतलाल ग्रुपची प्रमुख कंपनी मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड (एमआयएल) ने मेडिकल ॲपरलसाठी समर्पित डिजिटल प्लॅटफॉर्म मफतलाल मेडफिट्स (www.mafatlalmedfits.com) लाँच करत ई-कॉमर्स क्षेत्रातील आपल्या प्रवेशाची घोषणा केली आहे. कंपनीचे हे लाँच पहिल्या डायरेक्ट-टू-कंझ्युमर (डी२सी) उद्यमाला दर्शवते, तसेच त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासामधील प्रमुख टप्पा आहे. लाँच करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मसह मेडिकल टेक्सटाइल विभागात मफतलाल हेल्थकेअरची उपस्थिती वाढली आहे. नवीन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये उच्च दर्जाच्या मेडिकल वेअरचा व्यापक पोर्टफोलिओ असेल, ज्यामध्ये स्क्रब्स, लॅब कोट्स, अंडर स्क्रब्स, मेडिकल कॅप्स आणि संबंधित उत्पादनांचा समावेश असेल. ही उत्पादने आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सर्वसमावेशक कार्यक्षम व आरामदायी गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. या डी२सी प्रवेशाच्या माध्यमातून मफतलाल इंडस्ट्रीजचा संपूर्ण भारतातील आपली पोहोच वाढवण्याचा, ब्रँड उपलब्धतता सुधारण्याचा आणि टेक्निकल टेक्सटाइल्समधील दर्जा, विश्वसनीयता व नाविन्यतेप्रती ब्रँडच्या दीर्घकालीन कटिबद्धतेला अधिक दृढ करण्याचा मनसुबा आहे. हा प्लॅटफॉर्म कार्यक्षम, आरामदायी व टिकाऊ मेडिकल ॲपरलसाठी एक-थांबा गंतव्य आहे, ज्याला मफतलालच्या दशकभराच्या टेक्सटाइल कौशल्याचे पाठबळ आहे. लाँचबाबत मत व्यक्त करत मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ रघुनाथ मन्नील बालकृष्णन म्हणाले, ‘मफतलाल मेडफिट्सचे लाँच आमच्या आरोग्यसेवा व टेक्निकल टेक्सटाइल्स पोर्टफोलिओच्या विस्तारीकरणामधील महत्त्वाचे पाऊल आहे. यामधून क्षमता, दर्जात्मक यंत्रणा व प्रक्रिया उत्कृष्टता निर्माण करण्यामधील आमची सातत्यपूर्ण गुंतवणूक दिसून येते. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही भारतभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रत्यक्ष आमच्या क्षमता देत आहोत, जेथे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टाइल्स व डिझाइन्समधील मेडिकल स्क्रब्स आणि संबंधित आवश्यक उत्पादने मिळतील, जी आरामदायीपणा, कार्यक्षमता आणि टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. या उपक्रमासह उच्च क्षमता असलेल्या विभागामध्ये ऑपरेशनल कार्यक्षमता, ग्राहकांसोबत समन्वय आणि शाश्वत विकासावरील आमचा भर अधिक पक्का झाला आहे.’ या लाँचमधून अंतिम वापरकर्त्यांसोबत जवळचे नाते निर्माण करण्यासाठी डिजिटल चॅनेल्सचा फायदा घेण्याप्रती, तसेच आपला आरोग्यसेवा पोर्टफोलिओ वाढवण्याप्रती कंपनीचा धोरणात्मक उद्देश दिसून येतो. तसेच, या लाँचमधून उत्पादन उत्कृष्टतेसह आधुनिक रिटेल व तंत्रज्ञान-केंद्रित वितरण मॉडेल्स एकीकृत करण्याप्रती मफतलाल इंडस्ट्रीजचा व्यापक दृष्टिकोन देखील निदर्शनास येतो. या प्लॅटफॉर्मवरील उत्पादनांची किंमत अत्यंत किफायतशीर आहे, जी 549 रुपयांपासून 1,999 रुपयांपर्यंत आहे.
Source link
बाजार वार्ता:मफतलाल इंडस्ट्रीजचा मेडिकल ॲपरल प्लॅटफॉर्म ‘मफतलाल मेडफिट्स’ लाँच, आरोग्यसेवा पोर्टफोलिओ वाढवला
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...
बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...
रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...
यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...
‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...
सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...






























