Homeमहाराष्ट्रठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड मुंबई नाशिकसह थेट गुजरातकडे जाणारा पर्यायी मार्ग...

ठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड मुंबई नाशिकसह थेट गुजरातकडे जाणारा पर्यायी मार्ग 33,64,00,00,000 रु.चा प्रकल्प


ठाणे कोस्टल रोड प्रकल्प: मुंबई प्रमाणे ठाण्यातही कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील हा पहिला कोस्टल रोड आहे. यामुळे  घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून हजारो वाहन चालकांची सुटका होणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई, नाशिक सह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे.  33,64,00,00,000 रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बाळकुंभ ते गायमुख दरम्यान 13.45 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ठाणे कोस्टल रोडचे बांधकाम वेगाने सुरू आहे. 3,364 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे.  या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आठ महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले होते. आठ महिन्यांतच प्राधिकरणाने कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे 50 टक्के काम पूर्ण केले आहे. पायाभूत कामानंतर, खांबांवर पिलर कॅप्स आणि आय गर्डर्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

देशातील पहिला ग्रीनफिल्ड रोड

एमएमआरडीएच्या मते, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोस्टल रोड प्रकल्प आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइल आणि सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देऊन, रस्त्याचा मोठा भाग
उड्डाणपूल म्हणून विकसित केला जाईल.

मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

या कोस्टल रोडवरील एका मार्गिकेवर फक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. गर्दीच्या वेळी घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब रांगा नेहमीच असतात. भिवंडी आणि कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक बाळकुंभजवळ ट्रॅफिक जाममध्ये अडकतात. जर महामार्गावर वाहन बिघाड झाला किंवा अपघात झाला तर अनेक किलोमीटर लांब रांगा लागू शकतात. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल. बाळकुंभ येथून कोस्टल रोडवर थेट प्रवेश शक्य होईल.

कोस्टल रोड महत्वांच्या मार्गांशी जोडणार

एमएमआरडीएने कोस्टल रोडला प्रस्तावित गायमुख-फाउंटन हॉटेल टनेल प्रकल्पाशी जोडण्याची योजना आखली आहे. एकदा हे प्रकल्प जोडले गेले की, वाधवान बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी होईल. याव्यतिरिक्त, कोस्टल रोड ठाणे रिंग मेट्रो आणि साकेत-अमाणे एलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडण्याची योजना आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!