Homeमहाराष्ट्रSanjay Raut Political Attacked On Alibaug Rahul Narvekar Controversy | 'आधी त्या...

Sanjay Raut Political Attacked On Alibaug Rahul Narvekar Controversy | ‘आधी त्या बाईची कानफटात कुणावर पडली?’, संजय राऊतांचा अलिबाग जमीन वादावरुन हल्लाबोल! ‘तर राहुल नार्वेकरांना…’


राहुल नार्वेकरवर संजय राऊत: निवडणुका आल्या की हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान करायचे हा भाजपचा खेळ आहे. त्यामुळे आम्ही हा सामना पहातच नाही. पाकिस्तानवर बहिष्कार, बांगलादेशीना हुसकायचं, मात्र जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा जय शाह यांना परवानगी दिली जाते. पाकिस्तानात टिपू सुलतानला नायक मानले जाते, मग त्यांच्याशी का सामना खेळता? असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

फडणवीस यांच्यातली आणि भाजपची उर्मी भरून आलीय. त्यांनी धिक्कार करायला हवा होता, ते ढोंगी लोक आहेत, ते अस करणार नाही. भारत पाकिस्तानवर स्वात मोठा जुगार खेळला जातो. मागच्यावेळी 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले, यंदा जास्त जातील आणि हेच पैसे पुलवामा सारखे हल्ले करायला वापरले जातील. त्यांनी धिक्कार करावा ना? टिपू सुलतानला ते नायक मानतात, फोटो उतरवणे हे किरकोळ असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर वक्तव्य केलंय. सपकाळ आणि काँग्रेसचे आम्ही बघू काय ते, आधी विषय कोणी घेतला? टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही. कोणीही काही बोलू द्या. मुंबईत भाजपने नाव दिलेत, मानखुर्द ला एका बगीचाला टिपू सुलतानचे नाव द्यायचा प्रयत्न झाला. टिपू सुलतानला मानणारे सर्व भाजपमध्ये आहेत, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलीय. अलिबागला दीक्षा शाह यांची जमीन किती हे नार्वेकर यांना विचारा. गावकऱ्यांवर नंतर काय दबाव आणला असेल? मीही त्याच गावचा आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.आणखी जर त्यातलं काही काढलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले. क्वालिटी कंट्रोल इंडियाचे प्रमुख दीक्षा शाह जे गुजरातचे आहेत. त्यांनी अलिबागामध्ये प्रचंड जमीन घेतलीय. आणि तिथं दलाली कोणी केली हे सर्वांना माहितीय. अमित शहा आणि जय शाह यांचे दीक्षा शाह हे जवळचे आहेत.
अगोदरचा व्हिडिओ कट झाला आहे. आधी त्या बाईची कानफटात कुणावर पडली. त्यानंतर पळापळ झाल्याचे राऊत म्हणाले.

अख्खी मुंबई खोदून ठेवलीय. हे सगळे कंत्राटदार बाहेरचे आहेत. यांना मुंबईचे काही माहित नाही. काल युपीतील सरपंच गेले. ते त्यांच्याच भाजपचे आहेत. ते रामभक्त होते. रामभक्ताला चिरडून मारले यांनी, अशी टीका राऊतांनी केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!