Homeमहाराष्ट्रतंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग अन् हृदयविकाराचा धोका:व्यसनांपासून नेहमी दूर राहा, डॉ....

तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग अन् हृदयविकाराचा धोका:व्यसनांपासून नेहमी दूर राहा, डॉ. प्रतिक घोडके यांचे आवाहन‎

व्यसनामुळे अनारोग्य वाढून शारीरिक बाधा येतात. आरोग्य, शिक्षण व कुटुंब व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊन कुटुंबातील लोकांमधे अशा व्यक्तींसोबत नकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागून ताणतणाव निर्माण होतात. वैद्यकीय उपचारांची गरज पडते. व्यसनांमुळे शरिरावर घातक परिणाम होतात. म्हणूनच व्यसनाधीन व्यक्तींमध्ये वेळेत बदल घडवून युवकांनीही व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवन जगावे, असे आवाहन दंतचिकित्सक डॉ. प्रतिक घोडके यांनी केले. मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयी आयोजित जनजागृतीपर व्याख्यानप्रसंगी डॉ. घोडके बोलत होते. ते पुढे म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर टाळा, नकार द्या, निरोगी हास्य टिकवा. अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम मोठे आहेत. अमली पदार्थ तोंडाचे सौंदर्य व आरोग्य दोन्हीही नष्ट करतात. सर्वप्रथम आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहा. दैनंदिन जीवनात नियमित दंत तपासणी करा, शारीरिक स्वच्छता राखा, व्यसनमुक्त जीवन जगा. आयुष्यात निरोगी जीवनासाठी हे सर्व अत्यंत आवश्यक आहे. प्राचार्य अल्फोन्सा डी. यांनी चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली. विद्यार्थीदशेतच व्यसनमुक्त समाज घडविण्याचे संदेश देण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक सर्वांनीच मी स्वतः अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही व इतरांनाही त्यापासून दूर राहण्यास प्रेरित करीन अशी प्रतिज्ञा घेतली. या सत्रासाठी नयना घोडके, समुपदेशिका आरती जाधव, पर्यवेक्षक पराग सानप, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उषा हासे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंबाखू, सिगारेटमुळे तोंडाचा कर्करोग होतो तंबाखू, सिगारेटमुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसांचे आजार आणि हृदयविकार होतात. दारूमुळे यकृत निकामी होऊ शकते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते असेही त्यांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!