HomeमनोरंजनKiss Day 2026 Special Health Benefits Of Kissing Valentine Week | Kiss...

Kiss Day 2026 Special Health Benefits Of Kissing Valentine Week | Kiss केल्याने मिळतात चक्क आरोग्यदायी फायदे, जाणून थक्क व्हाल!


चुंबनाचे आरोग्य फायदे: वेलेंटाइन वीकमधील रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि हग डे नंतर आता शुक्रवारी (13 फेब्रुवारी 2026 रोजी) किस डे आहे. वेलेंटाइन वीकमधील हग डे आणि किस डे हे फक्त प्रेमाचे दिवस म्हणून नाही तर या दिवसांचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे आवडत्या व्यक्तीला मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा थेट संबंध तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी असतो. असे अनेक अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया हे फायदे काय आहेत?

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आवडत्या व्यक्तीला Kiss केल्याने मिळणारे मानसिक फायदे कोणते?

1. शरीरात हॅपी हार्मोनचे प्रमाण वाढते: आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेतल्यास मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हार्मोन निर्माण होतात. जे मन प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात.

2. ताण-तणाव कमी होतो: शरीरातील तणावाला कारणीभूत असणाऱ्या कोर्टिसोल या हार्मोनची पातळी कमी होण्यास होते. ज्यामुळे मानसिक थकवा कमी होऊन मनाला शांतता मिळते.

3. सकारात्मक दृष्टिकोन वाढतो: सकाळी कामासाठी घरातून बाहेर निघताना तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेतल्यास मन आनंदी होते. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी ताण कमी जाणवतो, अधिक उत्साही आणि  सकारात्मक वाटते.

आवडत्या व्यक्तीला kiss केल्यास शारीरिक आरोग्यास कोणते फायदे मिळतात?

1. रक्तदाब नियंत्रणात राहतो: आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेतल्यास हृदयाचे ठोके काही प्रमाणात वाढतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच डोकेदुखी किंवा मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढते: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेता तेव्हा लाळेची देवाणघेवाण होते. शरीराला नव्या जंतूंची ओळख झाल्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी शरीर अँटीबॉडीज निर्माण करते. जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

3. कॅलरीज बर्न होतात, चेहऱ्याचा व्यायाम होतो: चुंबनामुळे एका मिनिटात अंदाजे 2 ते 26 कॅलरीज बर्न होतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच चुंबन घेताना चेहऱ्याचे अनेक स्नायू सक्रिय होतात. एकप्रकारे चेहऱ्याचा व्यायम होतो. ज्यामुळे त्वचा घट्ट राहते आणि सुरकुत्याही कमी होतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!