Homeदेश-विदेशOn this day 14 February black day in Indian history 2019 Pulwama...

On this day 14 February black day in Indian history 2019 Pulwama attack 40 soldiers shahid | भारतात 14 फेब्रुवारीला ‘काळा दिवस’ का म्हणून ओळखला जातो? व्हॅलेंटाईन डे दिवशी 40 कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला; जाणून घ्या इतिहास


14 फेब्रुवारी पुलवामा हल्ला: 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमदिन म्हणून साजरा केला जातो, पण भारतासाठी 2019 नंतर या तारखेला एक वेगळी आणि वेदनादायी ओळख मिळाली. पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 40 हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. आनंद आणि उत्सवाच्या रंगांऐवजी या दिवसाने अश्रू, वेदना आणि बलिदानाची आठवण दिली. त्यामुळेच अनेक भारतीय 14 फेब्रुवारीला ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात एकजूट व्यक्त करण्याचा हा भारतात दिवस असतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

14 फेब्रुवारी 2019 रोजी नेमके काय घडले?

त्या दिवशी सीआरपीएफच्या सुमारे 78 वाहनांचा ताफा जम्मू-काश्मीर महामार्गावरून श्रीनगरकडे निघाला होता. या ताफ्यात 2500 हून अधिक जवान होते. दुपारी सुमारे 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा परिसरात एक स्फोटकांनी भरलेली कार वेगाने येऊन जवानांच्या बसला धडकली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके (आरडीएक्स) भरलेली होती. धडक होताच भीषण स्फोट झाला. आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला आणि परिसर धुराने झाकला गेला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 76व्या बटालियनमधील 40 हून अधिक जवानांनी प्राणांची आहुती दिली. अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला, कुणाचा मुलगा, कुणाचा पती, तर कुणाचा भाऊ कायमचा दूर गेला.

जबाबदारी कोणी स्वीकारली?

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना Jaish-e-Mohammed यांनी स्वीकारली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. शहीद जवानांच्या स्मरणार्थ देशभरात श्रद्धांजली कार्यक्रम झाले आणि दहशतवादाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला.

त्यानंतरची कारवाई

या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट  येथे दहशतवादी तळांवर हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ म्हणून ओळखले जाते. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

14 फेब्रुवारीला ‘काळा दिवस’ का म्हणतात?

14 फेब्रुवारी 2019 हा दिवस केवळ एका दहशतवादी हल्ल्याची तारीख नाही, तर देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या स्मृतीचा दिवस आहे. त्यामुळेच हा दिवस अनेक भारतीयांसाठी शोक, स्मरण आणि श्रद्धांजलीचा दिवस बनला आहे. दरवर्षी या दिवशी शहीद जवानांना आदरांजली वाहून त्यांचे बलिदान स्मरले जाते  आणि म्हणूनच 14 फेब्रुवारी भारतात ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जातो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!