Homeमहाराष्ट्रअजितदादांची भाजपबाबतची भूमिका स्पष्ट होती:शशिकांत शिंदेंच्या दाव्यावर सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर, आर्टिकलच्या हेतूबाबतही...

अजितदादांची भाजपबाबतची भूमिका स्पष्ट होती:शशिकांत शिंदेंच्या दाव्यावर सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर, आर्टिकलच्या हेतूबाबतही सवाल

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून राजकारण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा विचार समोर आला, तर त्यावर पक्षपातळीवर चर्चा होईल. मात्र, आम्ही एनडीएचा घटक पक्ष असल्याने कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य आहे,” असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या भूमिकेबाबत केलेल्या दाव्याचाही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विलीनीकरणाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जेव्हा एखादी चर्चा सुरू होईल, तेव्हा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील. मात्र, आज एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. आम्ही २०२३ मध्ये जेव्हा एनडीएत सहभागी झालो, तेव्हा भाजपने आम्हाला अनुमती दिली होती. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या मोठ्या निर्णयावेळी आघाडीतील मुख्य पक्षाशी चर्चा करावीच लागेल.” शशिकांत शिंदेंच्या दाव्यावर आक्षेप शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात दावा केला होता की, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे नाटे षडयंत्र करून केलेले आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रीवादीतून बाहेर पडून, वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. पण झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची, अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. यावर संताप व्यक्त करत सुनील तटकरे म्हणाले, “शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू पाहत आहेत? त्यांचा हेतू काय? हे मला कळू शकले नाही.” अजितदादांची भाजपबाबतची भूमिका स्पष्ट होती “भाजपसोबत जाण्याची अजितदादांची भूमिका नवीन नव्हती,” असा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. २०१४, २०१६ आणि २०१७ मध्येही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. २०१९ मध्येही दादांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकते. त्यांनी आपली ही इच्छा कधीही लपवून ठेवली नव्हती, असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!