राखी सावंतचे बच्चन आणि रेखावर वादग्रस्त वक्तव्य आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागील कारण म्हणजे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवडूचे बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जय बच्चन यांच्यासंदर्भात काही वादग्रस्त विधानं केली आहेत. अमिताभ आणि जया बच्चन यांच्याऐवजी अमिताभ आणि रेखा यांची जोडी अधिक चांगली दिसते आणि अमिताभ यांनी रेखा यांचीच निवड करायला हवी होती, असं राखीने म्हटलं आहे. मात्र तिची ही विधानं असंवेदनशील असल्याचं म्हणत अनेकांनी तिच्यावर सोशल मीडियावरुन टीका केली आहे.
अमिताभ-रेखा राजा-राणी वाटतात तर जया.
राखी सावंतने अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यावर वादग्रस्त विधानं केली आहे. तिने अमिताभ बच्चन यांना रेखासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला आणि जया बच्चन यांच्या ड्रेसिंग सेन्सची थट्टा केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून राखीला ट्रोल केले जात आहे. राखीने ‘फिल्मीग्यान’ला ही मुलाखत दिली आहे. अमितजी, तुम्ही रेखाजींना स्वीकारा. आता तर दोन पत्नींचा काळ चालू आहे, असं राखीने म्हटलं आहे. “अमितजी, आप रेखा जी को अपना ले. अभी तो वैसे भी दो-दो बीवियों का ऐसा भी समय चल रहा है,” असं विधान राखीने केलं आहे.
राखीने अमिताभ आणि रेखा यांना ‘राजा-राणी’ म्हणून संबोधले आणि जया बच्चन या ‘मोलकरणी’ सारख्या दिसतात असे म्हणाली. अमिताभजी, जया यांना सोडून द्या, रेखासोबत राहा असा सल्लाही राखीने दिला. “जया यांनी सोडा आणि रेखा यांना पकडा आणि उरलेलं आयुष्य त्यांच्यासोबत घालवा,” असा सल्ला राखीने दिला आहे.
जया बच्चन यांना व्यवस्थित राहा असा सल्ला
जया बच्चन यांच्या फॅशनवर टीका केली. जया बच्चन या चांगले कपडे परिधान करत नाहीत. त्यांनी मला वाढदिवसाला बोलावलं तरी मी त्यांना एक छान सूट भेट देईन. जरा केस रंगवा असा सल्ला देतानाच राखीने अमिताभ तुमचे पती आहेत हे विसरु नका. “जया जी तो ढंग का सलवार-कमीज भी नहीं पहनती, इतनी करोड़पति-अरबपति होने के बावजूद. जया जी, आप मुझे अपने बर्थडे पे बुलाए, मैं आपको अच्छा सूट गिफ्ट करूंगी. आप बालों को कलर कीजिए, बॉटॉक्स कीजिए. आपके हसबैंड अमिताभ बच्चन हैं,” असं राखीने म्हटलं आहे.
अमिताभ यांनी जय बच्चन यांना का निवडलं?
“अमिताभ यांनी जया बच्चन यांनी निवड का केली? मला हेच समजत नाही. त्यांनी रेखांची निवड का केली नाही? मला कोणी अमिताभ यांच्यासाठी जया किंवा रेखा यांच्यामधून एखादीला निवडण्यास सांगितल्यास मी रेखांना निवडेल,” असं राखी म्हणाली.






























