दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान: टी-20 वर्ल्डकपमध्ये आज क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त रोमांचक सामना पाहण्यास मिळाला. तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: घाम काढला. अफगाणिस्तानने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. मात्र नंतर सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने सामना बरोबरीत सोडवला, ज्यामुळे डबल सुपर ओव्हर खेळवावी लागली. अखेर दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी हा सामना जिंकत वर्ल्डकपमधील मोठ्या पराभवाला हुलकावणी दिली. अफगाणिस्तानने विजय जवळपास खेचून आणला होता. पण थोडक्यात त्यांचा पराभव झाला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फंलदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 188 धावांचं आव्हान उभं केलं होतं. अफगाणिस्तान संघाला 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना संघ ऑल आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 18 धावांचं आव्हान दिलं असताना, दक्षिण आफ्रिकेने 17 धावा केल्या आणि सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये गेला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये
सुपर ओव्हरला अजमत आणि गुरबाज यांनी फलंदाजी केली. अजमतने 5 ओव्हरमध्ये 16 आणि गुरबाजने 1 धाव केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 18 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिेकडून ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांना फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. अफगाणिस्तानकडून फारुकीने गोलंदाजी केली. ब्रेविस एक षटकार मारुन बाद झाला. त्यानंतर स्टब्स फलंदाजीसाठी आला होता. एका चेंडूत 7 धावांची गरज असताना स्टबसने षटकार ठोकला आणि सामना पुन्हा एकदा बरोबरीत सुटला.
दुसऱ्या सोपर ओव्हरमध्ये काय झालं?
दुसऱ्या सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर स्टब्सने षटकार ठोकला. मिलरच्या सोबतीने त्याने 23 धावा केल्या आणि अफगाणिस्तानसमोर 24 धावांचं आव्हान ठेवलं. दोघांनी तीन षटकार, एक चौकार ठोकले. दक्षिण आफ्रिकेने केशव महाराजला गोलंदाजी दिली होती. गुरबाजने 3 षटकार ठोकत सामना जवळपास जिंकवला होता. पण अखेरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी हा सामना जिंकला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना झाला. अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने फलंदाजीसाठी निमंत्रण दिल्यानंतर रायन रिकेल्टन (28 चेंडूत 61) आणि क्विंटन डी कॉक (41 चेंडूत 59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत ६ बाद 187 धावा केल्या. अझमतुल्लाह उमरझाईने तीन विकेट्स घेतल्या. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर अफगाणिस्तानसाठी विजय महत्त्वाचा होता. एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्यात कॅनडाला पराभूत करून दोनपैकी दोन विजय मिळवण्याचे लक्ष्य होते.
टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिली सुपर ओव्हर
शेवटच्या ओव्हरला अफगाणिस्तानला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पण अफगाणिस्तानचा शेवटचा फलंदाज दोन चेंडू शिल्लक असताना धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरकडे गेला. दोन चेंडू शिल्लक असले तरी अफगाणिस्तानकडे एकही विकेट शिल्लक नसल्याने सामना सुपर ओव्हरकडे गेला.






























