जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकासाच्या राजकारणात ६८ पैकी ३८ जागा जिंकून वर्चस्व सिध्द केले आहे. अध्यक्षपद यंदा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. निवडणुकीत ओबीसीमधील १७ पैकी ९ जागा भाजपने जिंकल्या आहेत. मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्ग भाजपकडे झुकल्याचे हे चित्
.
नूतन सदस्यांच्या बैठकीत ते अध्यक्षपदासाठीचा अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष कानोसा घेऊ शकतात. अध्यक्षपदासाठी ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये दमदार दावेदार नसले तरी राजकीय वारसा असलेल्या कुटुंबामधील इतर काही ओबीसी प्रवर्गातील सदस्य आहेत. कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील चेहराही भाजप पुढे करु शकतो. परंतु जिल्ह्यात ओबीसी वर्गाचे असलेले प्राबल्य लक्षात घेऊन ही पावले उचलली जातील. त्यामुळे वरिष्ठ नेते ही उघडपणे कोणाचे नाव अथवा इच्छुक असल्याचे सांगत नाहीत. परंतु, आगामी काळात ओबीसी वर्गातून अनेक इच्छुक उमेदवार अध्यक्षपदावर दावा करतील. यात इच्छुकांची मर्जी राखण्यात भाजप नेत्यांची मोठी कसरत पहायला मिळणार आहे. भाजपला नगरपालिके पाठोपाठ जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच मोठे यश मिळाले. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्वच्या सर्व जागा भाजपच्या जिंकून आणून आपल्या नेतृत्वाची पक्षाला चुणूक दाखवली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह माढा, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्याचे भाजपचे नेते आपल्या कार्यकर्त्यांसाठी राजकीय खेळी करु शकतात.


























