Homeमनोरंजनबंगालचे सुदीप घरमीचे त्रिशतक अवघ्या एका धावेने हुकले, २५४ वर्षांच्या इतिहासातील पहिला...

बंगालचे सुदीप घरमीचे त्रिशतक अवघ्या एका धावेने हुकले, २५४ वर्षांच्या इतिहासातील पहिला भारतीय ठरला डॉन ब्रॅडमनचा दुर्दैवी पराक्रम


बंगाल सुदीप घारामीचे त्रिशतक एका धावेने हुकले: बंगालचा युवा फलंदाज सुदीप कुमार घरामी (Sudip Gharam) याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक अशी कामगिरी केली आहे जी कोणत्याही फलंदाजाला साध्य करायची इच्छा असेल. 2025-26 च्या रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध खेळताना सुदीपने जबरदस्त फलंदाजी करत द्विशतक ठोकलं. पण फक्त एका धावेने त्याचं त्रिशतक हुकलं. सोमवारी कल्याणी येथील बंगाल क्रिकेट अकादमीच्या मैदानावर तो 299 धावांवर बाद झाला, ज्यामुळे त्याचे नाव क्रिकेट इतिहासातील एका नकोशा रेकॉर्डमध्ये झाली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अशी होती सामन्याची स्थिती

आंध्र प्रदेशने त्यांच्या पहिल्या डावात 295 धावा केल्या. बंगालने प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 629 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे बंगालकडे 334 धावांची मोठी आघाडी आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील हा संघ आता उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे, कारण सामना बरोबरीत सुटला तरी बंगाल पहिल्या डावाच्या आघाडीच्या आधारे पुढील फेरीत प्रवेश करेल.

सुदीप घरामीच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद

या डावाचा मुख्य शिल्पकार सुदीप घरामी होता. त्याने 596 चेंडूंचा सामना करताना संयम आणि तंत्राचे अद्भुत उदाहरण दाखवलं. सुदीप व्यतिरिक्त, यष्टीरक्षक शाकिर गांधी (95), सुमंत गुप्ता (81) आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (53) यांनी अर्धशतकी खेळी खेळून संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 254 वर्षांच्या इतिहासात 299 धावांवर आपला खेळ संपवणारा तो फक्त पाचवा खेळाडू ठरला आहे.

इतिहासातील पहिला भारतीय खेळाडू ठरला सुदीप

महाराष्ट्राच्या शंतनू सुगवेकरचं नाव आधीच या यादीत असलं तरी, सुदीप घरामी 299 धावांवर बाद होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सुगवेकर आणि डॉन ब्रॅडमन दोघेही त्यांच्या संघाच्या सर्व विकेट्स गमावल्यानंतरही त्यांच्या डावात 299 धावांवर नाबाद राहिले. आंध्र प्रदेशच्या शेख रशीदने सुदीपला बाद केल्याने त्याचं त्रिशतक करण्याचं स्वप्न भंगलं. या खास यादीची सुरुवात 1932 मध्ये महान सर डॉन ब्रॅडमन यांनी सुरू केली होती. त्यांच्यानंतर न्यूझीलंडचे दिग्गज मार्टिन क्रो यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ही धावसंख्या केली.

299 धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी

सर डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया, 1932) शंतनू सुगवेकर (महाराष्ट्र, 1989) मार्टिन क्रो (न्यूझीलंड, 1989) एम.जे. पॉवेल (ग्लॅमर्गन, 2006) सुदीप घरामी (बंगाल, 2026)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!