HomeमनोरंजनSupreme court objection over WhatsApp meta privacy policy | "तुम्ही भारतीयांच्या वैयक्तिक...

Supreme court objection over WhatsApp meta privacy policy | “तुम्ही भारतीयांच्या वैयक्तिक गोपनीयतेशी खेळू शकत नाही…”; सर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्सअ‍ॅप-मेटावर टीका!


व्हॉट्सॲप आणि मेटा प्रायव्हसी पॉलिसीवर सर्वोच्च न्यायालय: आजकाल डेटा शेअरिंगमुळेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशात सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप आणि मेटा प्लॅटफॉर्म्सच्या गोपनीयतेच्या धोरणांबाबत “न्यायालय त्यांना “डेटा शेअरिंगच्या नावाखाली तुम्ही या देशातील लोकांच्या गोपनीयतेशी तडजोड करू शकत नाही.” असे म्हणत फटकारले आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

व्हॉट्सअ‍ॅप-मेटाच्या प्रायव्हेसी पॉलिसीवर सर्वोच्च न्यायालयाची टीका

2021 मध्ये स्पर्धा कायद्यांतर्गत वर्चस्वाचा गैरवापर केल्याबाबत भारतीय स्पर्धा आयोगाने मेटा कंपनीवर रू 213.14 कोटींचा दंड ठोठावला होता. याविरोधात मेटा आणि व्हॉट्सअॅपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत सुनावणी सुरू असताना, न्यायालयाकडून मेटाच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उठवला गेला आहे. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, ‘व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांचा खासगी डेटा शेअर करण्यासाठी सक्ती करत आहे’. तसेच ‘तुमच्या पॉलिसीची भाषा इतकी गुंतागुंतीची आहे की, ग्रामीण भागातील सामान्य माणसाला ती कशी समजणार? लोक न समजताच अटींना स्वीकारतात. आणि याचाच फायदा कंपनी घेते’ अशी टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

‘ही माहिती चोरी आहे’ – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ‘न्यायालय कोणालाही भारतीयांची वैयक्तिक माहिती विकण्याची किंवा त्याचा गैरवापर करण्याची परवानगी देणार नाही. लोकांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय जाहिरातींसाठी वापरणे ही एक प्रकारे ‘सामान्य नागरिकांची फसवणूक करून केलेली माहितीची चोरी आहे’ उदाहरण सांगायचे झाले तर, जेव्हा व्हॉट्सअॅपवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादा वापरकर्ता कोणत्याही वस्तुबद्दल चॅट करतो तेव्हा, त्याच वस्तुच्या जाहिराती किंवा रिल्स दिसू लागतात. बऱ्याचदा वापरकर्त्यांना आश्चर्य वाटते की, या इतके ‘रिलेटेबल’ रिल्स कशा दिसत आहेत! पण अशाचप्रकारे नकळत माहिती गोपनियतेच्या नियमांचे उल्लघंन केले जाते.

सर्वोच्च न्यायालयाचा मेटाला प्रश्न

यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाने, ‘वापरकर्ता व्हॉट्सअॅपवर एखाद्या आजाराबाबत किंवा डॉक्टरांशी बोलला, तर लगेचच त्याला औषधांच्या जाहिराती दिसू लागतात. हा डेटा नेमका कसा वापरला जातो, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच रस्त्यावर फळे विकणारी महिला किंवा इतर सामान्य व्यक्ती या कठीण पॉलिसी कशा समजू शकेल? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मेटा आणि व्हॉट्सअॅपकडून ‘ते लोकांची वैयक्तिक माहिती व्यावसायिक फायद्यासाठी वापरणार नाहीत’ अशी हमी मागितली आहे. दरम्यान लवकरच मेटा यावर एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणार आहे.

पुढील सुनावणी कधी?

या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयाने त्यांची बाजू सिद्ध करण्यासाठी आणि सविस्तर उत्तर देण्यासाठी काही वेळ दिला असून पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी (सोमवारी) होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा...

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!