Homeमहाराष्ट्रशैक्षणिक:मोबाइलचा अति वापर हेही एका प्रकारचे व्यसनच, यामुळे लक्ष विचलित होते- डॉ....

शैक्षणिक:मोबाइलचा अति वापर हेही एका प्रकारचे व्यसनच, यामुळे लक्ष विचलित होते- डॉ. सविता वावगे

प्रतिनिधी | लासूर स्टेशन म.शि.प्र. मंडळ संचलित छत्रपती शाहू महाविद्यालयात ४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यसनमुक्ती जागृतीसाठी भित्तीपत्रक स्पर्धा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी व्यसनमुक्तीवर आशयपूर्ण भित्तीपत्रके सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. माया कटारिया आणि प्रा. डॉ. सविता वावगे यांनी केले. त्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे देण्यात आली. प्रा. डॉ. माया कटारिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मोबाईलचा अति वापर हेही व्यसन आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. हे व्यसन समाजासाठीही घातक ठरते. प्रा. डॉ. सविता वावगे यांनी व्यसनांचे शारीरिक आणि मानसिक प्रकार स्पष्ट केले. माणूस हळूहळू व्यसनाच्या आहारी कसा जातो, याचे विश्लेषण त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली भित्तीपत्रके बोलकी असून त्यातून व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले आहेत, असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी व्यसनावर आधारित एक कथा सांगून विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. प्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब पवार यांनी अध्यक्षीय भाषणात ‘कळतं पण वळत नाही’ आणि ‘अति तिथे माती’ या म्हणींचा संदर्भ दिला. अतिरेक शेवटी विनाशाकडे नेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. अति खाणे हेही व्यसन असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य हे प्रत्येकाने ठरवावे, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. विलास अहिरे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. डॉ. मधुकर साठे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर होळकर, प्रा. दीपक जाधव, प्रा. सुषमा शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. मधुकर साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उमा खुरसने यांनी केले. आभार प्रा. दीपक जाधव यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासुरस्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात व्यसनमुक्ती जागृती भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाश घडवतो ^अतिरेक शेवटी विनाशाकडे नेतो. अति खाणे हेही व्यसन आहे. मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य हे प्रत्येकाने ठरवावे आणि त्या अनुसार अति वापराच्या सवयी बदलाव्या. – डॉ. बाळासाहेब पवार



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!