Homeमहाराष्ट्रAjit Pawar Death Case Amol Mitkari Serious allegation on VSR Company Marathi...

Ajit Pawar Death Case Amol Mitkari Serious allegation on VSR Company Marathi News | ‘पायलट सुसाईड बॉम्बर, कंपनीकडून डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा आणि…’ अमोल मिटकरींचे गंभीर आरोप!


अमोल मिटकरी ही व्हीएसआर कंपनी आहे: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा केवळ अपघात नसून कटकारस्थान असल्याची शंका व्यक्त केली. ते म्हणतात, अजितदादा इतके सामान्य नेते नव्हते की त्यांचा मृत्यू इतक्या सहजासहजी स्वीकारावा. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. यासोबतच त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘पायलट सुसाईड बॉम्बर’

अजित पवारांची हत्या करण्यासाठी विमानात सुसाइड बॉम्बर बसवला गेला असावा. यावेळी त्यांनी राजीव गांधी हत्याकांड आणि मुंबईतील अजमल कसाब सारख्या घटनांची आठवण करून दिली. अशा पद्धतीने घातपात केला जाऊ शकतो. हा दावा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा ठरलाय.

विमान आणि पायलटबाबत शंका

मिटकरी यांनी विमान कंपनीवर (VSR) गंभीर आरोप केले. हे विमान एक वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंदीमध्ये होतं, तरी अजित पवारांना दिलं गेलं. पायलट दोनदा बदलले गेले. शेवटच्या पायलटला मारुन 50 कोटी इतक्या मोठ्या विमा रकमेच्या आमिषासाठी प्रवृत्त केलं गेलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आपत्कालीन स्थितीत ‘मे-डे’ कॉल का आला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

इतर संशयास्पद मुद्दे

अपघातानंतर कागदपत्रे जळाली नाहीत, पण मृतदेह जळाले. अजितदादांचं घड्याळ गायब झालं. विमानात 6 जण होते असं सांगितलं गेलं, पण फक्त 5 मृतदेह सापडले. मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी मिटकरी करतात. ब्लॅक बॉक्स अहवाल येण्याआधीच हे पुरावे हवे, असं ते सांगतात.

नेमकं काय म्हणाले मिटकरी?

अजित पवारांचा घातपात आहे यावर मी ठाम आहे. विमान नादुरस्त होतं. एक वर्षापासून त्यावर बंदी होती. व्हीएसआर विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आला. पहिल्या दिवशी रस्तेमार्गे पुण्याला जाणार होते. त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. व्हीएसआर कंपनीकडून पायलटचा 50 कोटींचा विमा काढला होता. VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलट चा 50 कोटी रुपयाचा विमा उतरविला होती. कुटुंबाची काळजी करु नका आम्ही सर्व बघू, असे कंपनीकडून सांगण्यात आले का? हे तपासायला हवे. या कंपनीचे पायलट अजमल कसाबसारखे हिप्नोटाईज केले का हे तपासावे. व्हीएसआर कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, असे मिटकरी म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!