Homeमहाराष्ट्रCTET परीक्षा केंद्रात दागिन्यांवर बंदी:महिला उमेदवारांना मंगळसूत्रही काढायला लावले; ठाकरे गटाने VIDEO...

CTET परीक्षा केंद्रात दागिन्यांवर बंदी:महिला उमेदवारांना मंगळसूत्रही काढायला लावले; ठाकरे गटाने VIDEO पोस्ट करत साधला निशाणा

सीटीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या महिला परीक्षार्थींवर अंगावरील दागिनेच नव्हे तर गळ्यातील सौभाग्याचे लक्षण असणारे मंगळसूत्रही परीक्षा केंद्राबाहेर काढून ठेवण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या सूचनेमुळे या परीक्षार्थींची मोठी गैरसोय झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारवर शरसंधान साधत सीटीईटी परीक्षा हिंदुस्तानात झाली की पाकिस्तानात? असा तिखट सवाल केला आहे. आज राज्यासह देशभरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) सुरू आहे. पण छत्रपती संभाजीनगर येथील महिला उमेदवारांना या परीक्षेपूर्वी एक वेगळीच परीक्षा द्यावी लागली. या महिला उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या आत जाण्यापूर्वी चक्क आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून बाहेरच ठेवावे लागले. ही परीक्षा सकाळी साडे 9 ते दुपारी 12.30 पर्यंत होती. यासाठी सकाळी 7 वा. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर हजर व्हायचे होते. यावेळी प्रशासनाने सर्वच उमेदवारांना अंगावरील दागदागिन्यांसह कोणत्याही प्रकारचे मेटल परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मज्जाव केला. यात गळ्यातील मंगळसूत्राचाही समावेश होता. महिला उमेदवारांची झाली पंचाईत प्रशासनाने ऐनवेळी गळ्यातील मंगळसूत्रही काढून ठेवण्याची सूचना केल्यामुळे महिला उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली. ज्यांच्यासोबत कुटुंबातील एखादा सदस्य आला होता, त्यांच्यापुढे कोणताही प्रश्न नव्हता. पण ज्यांच्यासोबत कुणीही नव्हते, त्या महिला उमेदवारांची यामुळे चांगलीच पंचाईत झाली. सुरक्षेच्या नावाखाली होणारी ही अडवणूक अत्यंत चुकीची आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे आहे. ते गळ्यातून कसे काढायचे? ते कुणाकडे ठेवायचे? अशी संतप्त भावना यावेळी या उमेदवारांनी व्यक्त केली. यामुळे परीक्षा केंद्रावर काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळसूत्र हा दिखाव्याचा दागिना नाही ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला. सीटीईटी परीक्षेसाठी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रही काढण्याची सूचना करण्यात आली. मंगळसूत्र हा दिखाव्याचा दागिना नाही तर तो सौभाग्याचा दागिना आहे. परीक्षा केंद्रावर अशी सक्ती केली जात असेल, तर खूप गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? अंबादास दानवे यांनी या घटनेचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी परीक्षा हिंदुस्तानात आहे की, पाकिस्तानात? असा प्रश्न केला आहे. विचित्र विरोधाभास! ‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. 11 वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला ‘मंगळसूत्र’ आणि ‘कॉपी’ मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही, असे त्यांनी भाजप व सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!