जिल्ह्यात १ मोठ्या, ७ मध्यम सह ४८ लघु प्रकल्प असून, सद्यः स्थितीत सर्व प्रकल्पांमध्ये ७१.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आगामी काळात पाण्याची तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ८४ टक्के पाणीसाठा होता. तो य
.
गत वर्षी जिल्ह्यातील समाधानकारक पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने अनेक धरणातील पाण्याची पातळी कमी होती. अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा धरणात १३ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लहान, मोठे, मध्यम असे एकूण ५६ मध्यम प्रकल्प आहे.
यामध्ये गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत ८४ टक्के पाणीसाठा होता. तर सद्यःस्थितीला याच प्रकल्पांमध्ये ७१.६६टक्के उपयुक्त साठा आहे. जर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात आजपर्यंत ३९८.३० दलघमी पाणीसाठा असून, याची ७०.६१ इतकी टक्केवारी आहे.
तसेच शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, आणि गंगा या सहा मध्यम प्रकल्पात ८८.४६ दलघमी असून, याची ५६.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. तर एकूण ४२ लघु प्रकल्पात ५०.५७ दलघमी असून ४८. ९९ टक्के इतका पाणीसाठा आहे. १ मोठा ६ मध्यम तर ४२ लघु प्रकल्पात १६२.६७. २४ दलघमी पाणीसाठा असून ७१.६६ इतके टक्के पाणी आहेत.
Appe-Aardha 70.61 ãuse Shahsan 73.8 3A


























