Homeदेश-विदेशपाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी टी-20 विश्वचषकात भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचे...

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी टी-20 विश्वचषकात भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं असून, ते योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसंच, बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी ही एक विचारपूर्वक घेतलेली भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कराचीमध्ये एका सरकारी बैठकीनंतर शरीफ म्हणाले, “आम्ही टी-20 विश्वचषकाबाबत खूप स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भारतासोबतचा सामना खेळणार नाही. कारण खेळाच्या मैदानावर राजकारण होता कामा नये”. आम्ही अतिशय विचारपूर्वक भूमिका घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पाकिस्तान क्रिकेट संघाने 15 फेब्रुवारी रोजी नियोजित भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची निवड करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जर पाकिस्तान क्रिकेट संघ या महत्त्वाच्या सामन्यासाठी उपस्थित राहिला नाही, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिला आहे. हा सामना प्रायोजक, प्रसारक, जाहिरातदार आणि स्वतः आयसीसीसह अनेक संबंधितांसाठी मोठा आर्थिक फायद्याचा स्रोत आहे.

एका निवेदनात, आयसीसीने म्हटलं आहे की, पीसीबी आपल्या देशातील क्रिकेटवर होणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल अशी आशा आहे. कारण याचा जागतिक क्रिकेट परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा पीसीबी स्वतः एक सदस्य आणि लाभार्थी आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ शनिवारी नेदरलँड्सविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी कोलंबोमध्ये आहे. पीसीबीने म्हटलं आहे की, बाद फेरीत भारताशी सामना करावा लागला तरीही ते आपल्या सरकारच्या निर्णयासोबत ठाम राहतील.

वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून वगळल्यानंतर बांगलादेशने भारतात प्रवास करण्यास नकार दिला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वेगवान गोलंदाजाच्या सहभागामागील कारण स्पष्टपणे नमूद केलेले नाही, परंतु ही घटना बांगलादेशमध्ये वाढलेल्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भावनांच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.

कपिल देव यांनी पाकिस्तानला सुनावलं

1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हे प्रकरण फक्त राजकारणापुरतं मर्यादित नसून थेटपणे अनेक तरुण क्रिकेटर्सच्या करिअवर प्रभाव पाडणारं आहे.

ते म्हणाले, “जर खेळाडूंनी हा निर्णय घेतला असेल तर ते पुढे येऊन ते सांगू शकतात. पण जर बोर्डाने म्हटलं की ते खेळणार नाहीत, तर ते देशाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेस.” त्यांनी पुढे इशारा दिला की वारंवार माघार आणि बहिष्कारामुळे पाकिस्तान क्रिकेट एकटे पडेल. “ही परिस्थिती पाकिस्तानसाठी चांगली दिसत नाही. तुम्ही संपूर्ण पिढी नष्ट करत आहात,” असा इशाराही त्यांनी दिला.

या बहिष्कारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) अस्वस्थ स्थितीत आणलं आहे. भारत-पाकिस्तान सामने हे ICC स्पर्धांचा व्यावसायिक कणा मानले जातात आणि अनेकदा प्रसारण महसुलाचा महत्त्वपूर्ण भाग निर्माण करतात.

IND vs PAK: वाद नेमका कुठून सुरु झाला?

बांगलादेश संघ टी-20 वर्ल्डकपचा भाग नसून, त्यांच्या जाही स्कॉटलंड संघाला समाविष्ट करण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर नाराजी व्यक्त करत बांगलादेश संघाच्या समर्थनार्थ निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला श्रीलंकेत जाण्याची परवानगी दिली आहे, मात्र 15 फेब्रुवारीत भारताविरोधातील सामना न खेळण्याची अट ठेवली आहे.

क्रिकेटच्या भाषेत याला ‘सिलेक्टिव पार्टिसिपेशन’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ आपल्या मर्जीने काही सामने खेळणे आणि काही न खेळणे. ही आपल्या तत्वांची लढाई आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पण आयसीसी हा स्पर्धेच्या प्रतिष्ठेसाठी आणि व्यवसायासाठी हा एक मोठा धोका मानत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!