Homeमहाराष्ट्रअखेर गुरुकुंज मोझरी-तिवसा लालपरी थांबली; ‘प्रहार’च्या आंदोलनाला यश:पंचवटी चौकात एसटी थांबत नसल्याने...

अखेर गुरुकुंज मोझरी-तिवसा लालपरी थांबली; ‘प्रहार’च्या आंदोलनाला यश:पंचवटी चौकात एसटी थांबत नसल्याने प्रवाशांची होत असे धावपळ‎

गुरुकुंज मोझरी व तिवसा शहरातील मुख्य चौक असलेल्या पंचवटी येथे एस.टी. (लालपरी) बस थांबत नसल्याने प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीविरोधात प्रहार संघटनेने माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख, योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, कपिल उमप, अंकुश गायकवाड, नीलेश राऊत, इरशाद बेग, आदींनी गुरुकुंज मोझरी बसस्थानक परिसरात केलेल्या उपोषण आंदोलनाला यश मिळाले आहे. एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना जाहीर करून लेखी आदेश दिल्यानंतर प्रहारचे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र, भविष्यात अडचणी कायम राहिल्यास अमरावती विभागीय नियंत्रक कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तीर्थक्षेत्र असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था असून दररोज मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी प्रवासी मोठ्या प्रमाणात येथून ये-जा करतात. मात्र एसटी बस अधिकृत बस स्थानकावर न थांबल्याने विद्यार्थ्यांसह प्रवासी व नागरिकांना तासन् तास बसची प्रतीक्षा करावी लागत होती. याबाबत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी २ फेब्रुवारीपासून गुरुकुंज मोजरीच्या बसस्थानक परिसरात उपोषण आंदोलन सुरू केले. उपोषणानंतर पुणे, शिर्डी, धुळे, संभाजीनगर तसेच नागपूर-अमरावती मार्गावरील बस मोझरी व तिवसा येथे नियमित थांबू लागल्या. विभागीय नियंत्रक कार्यालयाने वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करून, न थांबणाऱ्या एसटी बसवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले असून, प्रहार संघटनेने केलेल्या मागणीनुसार नवीन बससेवा, विशेष तीर्थक्षेत्र बस, सीसीटीव्ही व भरारी पथक आदी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या मागण्यांवर अंमलबजावणी सुरू झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले असून प्रवाशांना पुन्हा त्रास झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रहारने स्पष्ट केले आहे. यादरम्यान उपोषणस्थळी विभागीय नियंत्रक बेलसरे, देशमुख, जयदीप घोडे, नियंत्रक संदीप रायलवार, यांनी दिलेल्या लेखी पत्र व आश्वासनाणे आंदोलन स्थगित करण्यात आले. एसटीचा होता टप्पे कमी करण्याचा प्रयत्न मुख्य चौकात एसटी न थांबवता प्रवासातील टप्पे कमी करण्याचा हा एक प्रयत्न होता. परंतु, पंचवटी चौकात एसटी थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यांना पंचवटी चौकापासून ते एसटीच्या मोझरी येथील मध्यवर्ती स्थानकापर्यंत ऑटो किंवा रिक्षाचे पैसे खर्च करून जावे लागत होते. यात त्यांची चांगलीच धावपळ व्हायची. वेळही वाया जायचा. बरे बस स्थानकावर पोहोचल्यानंतर बसायला जागा मिळेल, याची शाश्वतीही नसायची. त्यामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले होते. ही बाब लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रहारतर्फे आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. या आंदोलनाचा अखेर फायदा झाला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!