HomeमनोरंजनKnow Why you should not take any cough syrup without a doctor...

Know Why you should not take any cough syrup without a doctor advice health care tips marathi news | डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी-खोकल्याचे औषध घेताय? थांबा! होऊ शकतात जीव घेणे परिणाम


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका: हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. यावेळी सर्दी आणि खोकला या सामान्य आजारांना सर्वांनाच सामोरे जावे लागते. अशात हवेतील प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे संक्रमण वाढले आहे. ज्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. अनेकजण ‘अशा साधारण सर्दी-खोकल्यासाठी दवाखान्यात कशाला जायचं’ असा विचार करतात, आणि जवळच्या मेडिकलमधून काही ठराविक औषधे घेतात. पण तुम्हाला माहित आहे का? की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे काहीवेळा तुमच्या जीवावरही बेतू शकतात. यामुळे आरोग्यास कोणते गंभीर धोके होऊ शकतात? हे जाणून घ्या आणि वेळीत सावध व्हा.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे का आहे आवश्यक?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीची औषधे घेतल्यास साधारण सर्दी खोकलाही हृदयविकार, मेंदू, लिव्हर आणि मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येचे कारण बनू शकते. या औषधांमध्ये कंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स, खोकला आणि वेदना कमी करणाऱ्या गोळ्यांचा किंवा कफ सिरपचा समावेश असतो. काहीवेळा घरात पूर्वीच्या उरलेल्या औषधांचा साठा असल्यास सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसताच लगेचच त्या औषधांचे सेवन केले जाते. या औषधांमुळे काही प्रमाणात आराम तर मिळतो. पण अतिप्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊन औषधे बाधू शकतात.

आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतील?

डेक्स्ट्रोमेथोर्फन सारखे खोकला कमी करणारे औषध अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे चक्कर येणे, मती गोंधळल्या सारखी होणे, असामान्य वर्तन आणि मूड स्विंग्स होऊ शकतात. तसेच ताप असल्यास सर्वात अधिक पॅरासिटामॉल आणि डोलो यांसारख्या औषध गोळ्या घेतल्या जातात. पण जर तुम्ही आधीच इतर औषधे घेत असाल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात या गोळ्या घेतल्या तर त्या यकृत आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे पोटात रक्तस्त्राव होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे अशा जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.

इतरांनाही सावध करा!

यामुळे कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. तसेच कोणत्याही औषधांचे सेवन अतिप्रमाणात करू नका. यामुळे तात्पुरता आराम मिळेल पण आयुष्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच ही बातमी तुमचे कुटुंबिय आणि जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. वेळीच सावध व्हा!

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!