Homeमहाराष्ट्रअजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू


अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूला आज एक आठवडा पूर्ण झाला. अजित पवारांंचं विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं आणि या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात आता वेगवेगळे दावे केले जात असतानाच ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या गावातील सरपंचाने सांगितलेलं घटनाक्रम हादरवून सोडणार आहे. विमान अपघातानंतरही विमानातून प्रवास करणारे काहीजण जिवंत होते असं या विधानावरुन स्पष्ट होतं. या सरपंचाने नेमकं काय सांगितलं आहे जाणून घेऊयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणत्या गावात कोसळलं हे विमान?

अजित पवारांच्या विमानाचा अपघात धावपट्टीजवळ झाला असला तरी ते ठिकाण बारामती विमानतळापासून 2 किलोमीरटवर आहे. अपघात बारामती विमानतळाजवळील गोजुबावी (Gojubavi) गावाच्या परिसरात झाला. या गावाला तशी विमानांची सवय आहे. गोजुबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. पोलिसांना सर्वात आधी या अपघाताबद्दल माहिती देणारे कल्याण आटोळेच होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याण आटोळेंनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे.

पडले… पडले म्हणत गावकरी विमान क्रॅश झालेल्या ठिकाणी पोहोचले

“विमानतळावर विमान येणे-जाणे आमच्यासाठी आता नवीन नाही. त्या दिवशी ‘दादा’ (अजित पवार) येणार आहेत हे माहिती होते. पण अचानक विमानाचा वेगळा आवाज आला. पाहिले तर विमान डाव्या बाजूला कलले आणि विमान जमिनीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात धूर निघत होता,” असं कल्याण आटोळे म्हणाले. विमान कोसळल्याचं लक्षात येताच गावातील अनेकजण विमान कोसळलेल्या ठिकाणाकडे मदतीसाठी धावले. “पडले.. पडले… असं ओरडत गावकरी मोटारसायकलीवरुन घटनास्थळाकडे धावले,” असं कल्याण आटोळेंनी सांगितलं.

विमानाचा दरवाजा उघडा होता आणि कोणीतरी…

कल्याण आटोळेंसहीत गावकरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोर काय दिसलं याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे. “विमानाचा दरवाजा उघडा होता. त्यातून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, असं आम्हाला दिसलं. तितक्यात मोठा स्फोट झाला, आमच्या नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले. आगीचे लोळ आणि आवाज इतके भीषण होते की आम्ही सगळेजण मागे पळालो,” असं कल्याण आटोळे म्हणाले.

तीन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह गावकऱ्यांनीच काढला बाहेर

अजित पवारांचं या अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कल्याण आटोळेंना अश्रू अनावर झाले. “या स्फोटाने अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतले. हा धक्का इतका मोठा आहे की त्यामधून अजून सावरता येत नाही,” असंही कल्याण अटोळे म्हणाले. गावकऱ्यांनीच जळणाऱ्या विमानाच्या अवशेषांमधून चार जणांना बाहेर काढले. यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला होती. अजित पवारांचा अंगरक्षक वीदिप जाधव यांची ओळख पटवता आली. तर अजित पवारांचा मृतदेह सर्वात आधी त्यांचे निकटवर्तीय सहकारी आणि त्यांना विमानतळावर रिसिव्ह करण्यासाठी आलेल्या किरण गुजर यांनी ओळखला. अनेक गावकऱ्यांनी विमान विचित्र आवाज करत घिरट्या घालत कोसळल्याचे सांगितले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!