HomeमनोरंजनT20 विश्वचषक 2026 पाकिस्तानने भारताविरुद्ध बहिष्काराच्या निर्णयानंतर इतर क्रिकेट मंडळांना पाठिंबा मागितला...

T20 विश्वचषक 2026 पाकिस्तानने भारताविरुद्ध बहिष्काराच्या निर्णयानंतर इतर क्रिकेट मंडळांना पाठिंबा मागितला आहे.


T20 विश्वचषक 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र अशातच रविवारी पाकिस्तान सरकारने घोषणा करून 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध नियोजित ग्रुप स्टेज सामन्यावर बहिष्कार टाकलाय. त्यानंतर आता आयसीसी या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता भारताविरुद्ध सामन्याचा बहिष्कार केल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) मदतीसाठी तडफडत आहे. पाकिस्तानने त्यांच्या या निर्णयाला इतर क्रिकेट बोर्डांचा पाठिंबा मिळावा यासाठी अनेक क्रिकेट बोर्डांशी संपर्क केला. पण त्यांना कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळालेला नाही.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आयसीसीशी केला नाही संपर्क :

NDTV ला सूत्रांनी सांगितलं की पाकिस्तानने त्यांनी घेतलेल्या बहिष्काराच्या निर्णयाला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने दुसऱ्या बोर्डशी सुद्धा संपर्क केला. पण त्याचे परिणाम हे निराशानजनक ठरले. कारण कोणत्याही क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान बोर्डाचं समर्थन केलं नाही. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर केलेल्या सार्वजनिक घोषणेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत बहिष्काराच्या निर्णयाबद्दल आयसीसी सोबत औपचारिक संपर्क साधला आहे.

पाकिस्तानचा बहिष्कार निराधार:

इतर आंतरराष्ट्रीय बोर्डांकडून पीसीबीला मिळालेला अभिप्राय स्पष्ट आणि सरळ होता. कोणीही त्यांच्या या निर्णयाला समर्थन केलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात पाकिस्तानला कायदेशीर मान्यता नाही यावर सर्वसाधारण एकमत आहे. पाकिस्तानचा बहिष्काराचा निर्णय मनमानी मानला जात आहे. पीसीबीकडे बहिष्काराचे कोणतेही ठोस कारण नाही. रविवारी पाकिस्तानच्या अंडर 19 संघाने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध सामना खेळला, त्यावेळी त्यांनी कोणताही निषेध किंवा बहिष्काराचा उल्लेख केला नाही.

हेही वाचा : T20 World Cup 2026: वार्म-अप सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने! सामना कधी, कुठे Live Streaming पाहायचा?

भारत आणि पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये :

टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असणार आहे. या संघांना एकूण ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आलं असून यात ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया असे पाच संघ असून हे एकमेकांविरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळतील. यापैकी 15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना हा श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणार होता. मात्र याच सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. आता यावर आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

आयसीसी पाकिस्तानवर काय कारवाई करू शकते?

1. पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडू शकतो.
2. पाकिस्तानला आयसीसीकडून मिळणारा वार्षिक महसूल, जो सुमारे 350 कोटी रुपये आहे, तो थांबवला जाऊ शकतो.
3. भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीसीबीला ब्रॉडकास्टर्स जिओ-हॉटस्टारला करण्यास सांगितले जाऊ शकते, जे सुमारे 200 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.
4. पीसीबी बाइंडिंग कॉन्ट्रेक्ट चे उल्लंघन करत आहे. म्हणून इतर आयसीसी सदस्य देश पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकांवर बहिष्कार टाकू शकतात. किंवा त्या मालिकांचा आयसीसी रँकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही आणि WTC मध्ये कोणतेही गुण मिळणार नाहीत.
5. परदेशी खेळाडूंना (निवृत्त किंवा फ्री एजंट वगळता) पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये सहभागी होण्यास मनाई केली जाऊ शकते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!