Homeदेश-विदेशCrime News ॲपवर आधारित टॅक्सी सेवा चालकाची फ्री राईड विरोधात शारीरिक संबंधाची...

Crime News ॲपवर आधारित टॅक्सी सेवा चालकाची फ्री राईड विरोधात शारीरिक संबंधाची मागणी महिलेने केली तक्रार


क्राईम न्यूज ॲप आधारित टॅक्सी सेवा: ऑनलाइन माध्यमातून टॅक्सी बूक करण्याची सुविधा ही अनेकदा फायद्याची ठरते. सध्या ऑनलाइन माध्यमातून टॅक्सीच काय बाईकही बूक करता येते. मात्र अशा प्रकारच्या ऑनलाइन सेवांचा वापर करताना अनेकदा कटू अनुभवही येतात. असाच एक प्रकार चंडीगडमधील एका तरुणीसोबत घडला आहे. ऑनलाइन टॅक्सी बूक केल्यानंतर तिचा समोरुन चालकाने भलतीच ऑफर दिली. या प्रकरणानंतर रात्री टॅक्सी बूक करणंही सुरक्षित राहिलेलं नाही का असा सवाल विचारला जातोय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

चालकाचं नाव, फोन नंबर, फोटो अशी माहिती बुकींनंतर मिळाली

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टमधील मजकुरानुसार, हा सारा प्रकार 27 जानेवारी आणि 28 जानेवारीदरम्यानच्या मध्यरात्री उघडला आहे. चंडीगडमधील सेक्टर 28 मधील तरुणीने इनड्राइव्ह अॅप्लिकेशनवरुन टॅक्सी बूक केली. टॅक्सी बूक झाल्यानंतर गाडीची सर्व माहिती, चालकाचं नाव, फोटो आणि फोन नंबर या तरुणीला मिळाला. आतापर्यंत सर्व काही ठीक होतं. मात्र नंतर जे काही घडलं ते रात्री अपरात्रीपर्यंत ऑफिसला काम करणाऱ्या मुलींपैकी एक असलेल्या तरुणीसाठी फारच धक्कादायक होतं.

आधी तिचं लोकेशन मागवलं

टॅक्सी चालकाने आधी या तरुणीचं लोकेशन मागवलं. आपण नेमके कुठे आहोत यासाठी लोकेशन हवं असेल असं समजून या मुलीने चालकाला तिचं लाइव्ह लोकेशन पाठवलं. त्यानंतर चालकाने अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “तू माझ्यासोबत सेक्स केला तर मी तुला मोफत फिरवेन. तसेच तू सांगशील तितके पैसे द्यायलाही मी तयार आहे,” असा मेसेज या चालकाने तरुणीला पाठवला. या तरुणीने चालकाने दिलेली ऑफर आणि मानसिक छळाला विरोध केल्यानंतर चालक तिची माफी मागतो. मात्र थोड्या वेळातच तो तिला धमकावू लागतो. “मी आता तुझ्या इथे येऊन तुला भेटू शकतो. कुठे येऊ? पोलीस स्टेशनला बोलवत असशील तर तिथेही येईन,” असा मेसेज या चालकाने केला.

मध्यरात्रीनंतर घरी जाताना हा सारा प्रकार घडल्याने तरुणी प्रचंड घाबरली. 28 तारखेला सकाळी तिने सेक्टर 26 मधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तक्रार नोंदवली. तिने पोलिसांना चॅटमधील सर्व स्क्रीनशॉट पुरावे म्हणून दिले आहेत. पोलीस आता अॅप्लिकेशन चालवणाऱ्या कंपनीच्या मदतीने चालकाचा शोध घेत आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा रात्री-अपरात्री एखाद्या महिलेने या अशा सोयी वापराव्यात की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर या स्क्रीनशॉटवर व्यक्त होताना म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!