Homeदेश-विदेशभारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 वरून 18 टक्क्यांवर केला आहे.


यूएस भारताने व्यापार कराराला सहमती दिली आहे: अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत लिहिलं आहे  की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवणे यासह अनेक विषयांवर चर्चा केली”.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितल्यानंतर काही वेळातच, टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे भारत-अमेरिका संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत मिळाले आहेत, जे मोठ्या शुल्कांमुळे बिघडले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली असल्याचा दावाही केला आहे. तथापि, अमेरिकेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवरील अतिरिक्त 25 टक्के शुल्क अद्याप कायम आहे.

बहुप्रतिक्षित अमेरिका-भारत व्यापार करारावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. या कराराला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता कारण भारत अमेरिकेसाठी आपले कृषी क्षेत्र खुले करण्यास तयार नव्हतं. ट्रम्प यांनी अखेरीस एक करार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी टॅरिफ कमी केले आहे आणि या कृतीला त्यांनी मैत्री आणि आदराचं प्रतीक म्हटलं आहे. या दूरध्वनी संभाषणादरम्यान, ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि भारताची तेल आयात अमेरिका व व्हेनेझुएलाकडे वळवण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध थांबवण्यास मदत होईल, ज्यामध्ये रोज हजारो लोक जीव गमावत आहेत.

नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार

“पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि त्यांच्या विनंतीनुसार, तात्काळ प्रभावीपणे, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली, ज्याअंतर्गत अमेरिका टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारत देखील अमेरिकेविरुद्धचे त्याचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पंतप्रधानांनी “बाय अमेरिकन” साठी देखील वचनबद्धता दर्शविली, ज्यामध्ये 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची यूएस ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादने आयात करणे समाविष्ट आहे. भविष्यात भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे काम करुन दाखवतात देतात, जे बहुतेक लोकांबद्दल बोललं जाऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!