संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील तीन आरोपींना सोमवारी (२ फेब्रुवारी २०२६) सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. हा निर्णय देताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने पालकांच्या भूमिकेवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. “अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या अशा घटनांसाठी त्यांचे आई-वडीलच जबाबदार आहेत,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. या प्रकरणातील एकूण १० आरोपींपैकी आदित्य सूद हा प्रमुख आरोपी होता. त्याच्या सोबतच न्यायालयाने आशिष मित्तल आणि अमर गायकवाड या दोघांनाही जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आदित्य सूद याच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रशांत पाटील आणि वकील आबिद मुलानी यांनी बाजू मांडली. जामीन मंजूर झाल्याची माहिती देताना प्रशांत पाटील यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलासा देताना काही अटीही घातल्या आहेत. आरोपी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करतील आणि कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत. रक्त नमुने बदलणाऱ्या आरोपीला जामीन या प्रकरणात जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये अमर सतीश गायकवाड याचा समावेश आहे. गायकवाडवर या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने ससून रुग्णालयातील एका डॉक्टरच्या सहाय्यकाला ३ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमर गायकवाड याच्यावर आहे. यापूर्वी २३ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने गायकवाडच्या जामीन अर्जावर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यानंतर आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने पालकांना सुनावले खडे बोल सुनावणीदरम्यान खंडपीठाने पालकांच्या बेजबाबदारपणावर नाराजी व्यक्त केली. न्यायालय म्हणाले, “पालक आपल्या मुलांना नियंत्रणात ठेवण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. नशिली पदार्थांचे सेवन हा वेगळा विषय आहे, परंतु आपल्या मुलांना कारच्या चाव्या देणे आणि मौज-मस्तीसाठी पैसे पुरवणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे”. अशा घटनांसाठी केवळ मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही तितकेच जबाबदार असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. नेमके प्रकरण काय होते? १९ मे २०२४ रोजी पुण्याच्या कल्याणी नगर भागात ही भीषण दुर्घटना घडली होती. एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कार चालवत दोन आयटी (IT) इंजिनिअर्सना धडक दिली होती. या धडकेत त्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी आरोपीच्या पालकांनी आणि डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये गायकवाड आणि इतर आरोपींचा सहभाग होता. पालकांसाठी धोक्याची घंटा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे की, केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही, तर पालकांनी आपल्या मुलांच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने सोपवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून तो इतरांच्या जीवाशी खेळ असल्याचे कोर्टाच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.
Source link
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण:रक्त नमुने बदलणाऱ्या मध्यस्थासह 3 आरोपींना जामीन मंजून, सुप्रीम कोर्टाने पालकांवर ओढले ताशेरे
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























