Homeदेश-विदेशअजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याबद्दल भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी...

अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याबद्दल भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी शंका आणि आरोप


अजित पवार विमान अपघातावर मुरलीधर मोहोळ अजित पवारांनी भाजपाच्या फाईल काढू असा इशारा दिला होता. अजित पवारांच्या इशा-यानंतर 10 दिवसांत अपघात झाला असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच अमोल मिटकरी यांनीही विमानात 6 लोक असताना 5 मृतदेहच का सापडले? अशी शंका उपस्थित केली आहे. यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अहवाल आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हटलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि नागरी वाहतूक विमान विभागाला पत्र देत यासंदर्भात चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. यानंतर आमच्या डीजीसीएच्या टीम पोहोचल्या आणि ब्लॅक बॉक्स हस्तगत केला. यासंदर्भात चौकशी केली जाणार असून, लवकरच सत्य समोर येईल. पण ही वेळ नाही, महाराष्ट्र दु:खात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत की अजितदादा आपल्या नाहीत. ही भावना महत्त्वाची असून, त्यात राजकारण करणं, आरोप करणं योग्य नाही,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तर राऊतांना आता कोणी किंमत देत नाही असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.

अजितदादांचा अपघात नाही, तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखल दिला आहे. तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच एक दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर  सत्यता मांडा,अशी मागणीही मिटकरींनी केली आहे.

संजय राऊतांनी मिटकरींनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर’ असून 6 लोक होते तर पाचच मृतदेह कसे? असं संजय राऊत म्हणाले आहेत. दादांचे कागद तसेच होते, हे कसं काय? हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

आमदार अमोल मिटकरींनी  अजित पवारांच्या विमान अपघातग्रस्तासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलं आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला असून  यातून सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे. तर DGCA  आणि AAIB टीम अपघाताच्या ठिकाणी तत्काळ पोहचून चौकशी प्रक्रिया केली असल्याचं म्हटलं आहे. लवकरच याचा अहवाल येईल असं मोहोळ यांनी सांगितलं आहे.

‘मसूरात काहीतरी काळे आहे’

दाल में कुछ तो काला है, असं वक्तव्य करत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघात नाहीतर घातपातचं म्हटलं जात असून महाराष्ट्रातील 80 टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच वेळेवर पायलट का बदलला गेला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत’

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला असून, त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. ब्लॅक बॉक्समधून अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. विमानाचे इतर अवशेषही दिल्लीत पोहचवले जातील.

28 जानेवारी रोजी बारामती विमान अपघातात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला आहे. विमान अपघात तपास ब्युरोद्वारे ब्लॅक बॉक्स डीकोड केला जाणार आहे. या ब्लॅक बॉक्समधून विमान अपघातासंर्भात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. विमानाचे इतर अवशेषही लवकरच दिल्लीचा पोहचवले जाणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!