Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू सामनाच्या संपादकीयमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू सामनाच्या संपादकीयमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजपवर टीकास्त्र


सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर यूबीटीने भाजपला फटकारले: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावरुन टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच या राजकीय खेळीमागे असल्याचा दावा ‘सामना’च्या अग्रलेखातून करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं राजकीय भविष्य काय असेल याबद्दलही ठाकरेंच्या शिवसेनेनं भाकित केलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार

“भविष्यात शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांचे काय होईल ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, पण 2029 ची विधानसभा भाजप ‘शत प्रतिशत’ स्वबळावर लढणार, हे निश्चित आहे. त्याआधी शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील. त्या वेळीच सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागेल. पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार, तेथे पक्षाचे आमदार ते निवडून कसे आणणार? त्यामुळे शिंदे व सुनेत्रा पवारांचे पक्ष पूर्णपणे फडणवीस यांच्या मेहेरबानीवरच अस्तित्व टिकवू शकतील,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये

“सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये. अजित पवारांचे कर्तृत्व, कष्ट करण्याची क्षमता, अफाट लोकसंग्रह व भाजपसमोर फार न झुकण्याची किमया त्या दाखवू शकल्या तर त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण होऊ शकेल. उपमुख्यमंत्रीपदास संवैधानिक मान्यता नाही, पण त्यांच्याकडे असलेल्या खात्यांना महत्त्व असते. अजित पवारांकडे असलेले अर्थ, नियोजन खाते महत्त्वाचे होते व त्यामुळे आमदार, कार्यकर्त्यांना सढळ हस्ते निधी वाटप होत असे. निवडणुकांतही अजित पवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. आमदार-कार्यकर्त्यांची बरी-वाईट कामे केली. सुनेत्रा पवार हे कसे हाताळतात, ते पाहावे लागेल. खिडकी उघडली की, हवेबरोबर विषारी कीटकही आत येतात याचाही अनुभव सुनेत्रा पवार घेतील,” असं ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’

“कदाचित सुनेत्रा पवार ‘गुंगी गुडिया’ न बनता प्रभावीपणे काम करतील. तेव्हा पटेल, तटकरे, भुजबळांची अडचण होईल. सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार नाहीत. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ

“अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!