Homeमहाराष्ट्रअजिंठा परिसरात बिबट्याचा वावर; 3 दिवसाला एका जनावराचा फडशा:15 किलोमीटर वर्तुळात भीती,...

अजिंठा परिसरात बिबट्याचा वावर; 3 दिवसाला एका जनावराचा फडशा:15 किलोमीटर वर्तुळात भीती, शेतकऱ्यांचे रात्री शेतात जाणे बंद‎

अजिंठा वन परिक्षेत्रामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. दीड महिन्यात बिबट्याने अजिंठा, अनाड, बोदवड, सराटी, हळदा, पिंपळदरी मुखपाठ आदी शिवारात धुमाकूळ घालत जवळपास १५ जनावरे फस्त केले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने काही ठिकाणी कॅमेरे लावले असून स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके हे आपल्या टीमसह परिसरात रात्री गस्त घालत आहेत. अजिंठा वन विभागाच्या हद्दीत बिबट्या दीड महिन्यापासून धुमाकूळ घालत आहे. दीड महिन्यात बिबट्याने १५ किमी परिसरात तब्बल १५ जनावरांचा फडशा पाडला आहे. यामुळे शेतकरी संतप्त होत असून पिंजरे लावण्याची मागणी करीत आहेत. चार दिवसांपूर्वी अजिंठा-अंधारी धरणाजवळ बिबट्या अनेक शेतकऱ्यांना दिसला. नागझिरी परिसरातील अनाड शिवारातील गट ३९ मधील शेतकरी अजिज खाँ मजीद खाँ यांच्या शेतात बैलासह पटाचे बैल, गोऱ्हे बांधलेले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे नागरिकांत भीती आहे. बिबट्या ट्रॅक होताच पिंजरे लावू Q बिबट्याची नागरिकांमध्ये भीती असून तुम्ही काय करतात? -बिबट्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. काही ठिकाणी कॅमेरे लावले आहेत, बिबट्या ट्रॅक होताच पिंजरे लावून जेरबंद केले जाईल. Q अजिंठा वनपरिक्षेत्रात किती बिबट्यांचा वावर असेल, सांगता येईल का? -अजिंठा वनपरिक्षेत्र जवळपास ९ हजार हेक्टरपर्यंत जंगल आहे. त्यामुळे बिबट्यांची एकंदरीत संख्या सांगता येणार नाही. Q एक बिबट्या रोज किती किमी फिरतो? -एक बिबट्या जवळपास २५ किलोमीटरमध्ये फिरत असतो. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे सेम आढळले आहेत. – संतोष दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी बैल, दुभती जनावरांच्या संवर्धनाचे वर्ष ^युनोस्कोने २०२६ हे वर्ष गाय, गुरे, दुभती जनावरे संवर्धनाचे वर्ष जाहीर केलेले आहे. त्यांच्यासाठी काम करण्याचे हे वर्ष आहे. त्यांना पुढे आणण्याचे हे वर्ष आहे. त्यांच्या संवर्धनासाठी काम करण्याचे हे वर्ष आहे. मात्र, बिबट्यांकडून जनावरांवर होणारे हल्ले पाहता हे चिंताजनक आहे. -डॉ. संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!