Homeमनोरंजनबजेट 2026 ev e कार ऑटोमोबाईल लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी

बजेट 2026 ev e कार ऑटोमोबाईल लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी


ऑटोमोबाईल बजेट 2026: केंद्र सरकारच्या वतीनं नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळत हा अर्थसंकल्प कर्तव्यभवनात सादर केला. यावेळी देशातील गरिब आणि वंचित घटकांसह सर्वसमावेशक विकास हे मुद्दे अर्थसंकल्पाकत अधोरेखित करण्यात आले होते. अशा या आर्थिक तरतुदींच्या घोषणेमध्ये वाहनप्रेमींनासुद्धा अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वाहन क्षेत्रामध्ये अर्थसंकल्पानंतर कसे बदल होणार?

अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थमंत्र्यांनी एका विशिष्ठ श्रेणीतील वाहनांसाठी मोठी सवलत जाहीर करत त्यामुळं ही वाहनं खरेदी करणाऱ्यांना थेट फायदा होताना दिसणार आहे. अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार EV अर्थात इलेक्ट्रीक वाहनप्रेमींसाठी केंद्रानं एक खास बाब जाहीर केली आहे. ती म्हणजे, या कारना असणाऱ्या बॅटरीचे दर.

केंद्र शासनानं भारताला जागतिक स्तरावर ईव्ही केंद्रांचं हब करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलत लिथियम बॅटरी (Lithium-ion Battery) च्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर कस्टम ड्यूटी (अबकारी कर) आणि जीएसटीच्या आराखड्यात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळं येत्या काळात इलेक्ट्रीक कार, स्कूटर आणि सायकलच्या दरांमध्ये मोठ्या फरकानं घट होण्याची शक्यता आहे.

लक्षात घ्या, ईव्हीच्या बॅटरीसाठी किती खर्च येतो?

कोणत्याही इलेक्ट्रीक वाहनाच्या एकूण किमतीत साधारण 40 ते 50 टक्के रक्कम ही या वाहनाच्या बॅटरीचीच असते. मात्र आता अर्थसंकल्पात लिथीयम, कोबाल्ट आणि निकोलसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या दरात घट झाल्यामुळं बॅटरीचं उत्पादनही कमी रकमेत होईल असं सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या निर्णयामुळं बॅटरी उत्पादनाच्या एकूणम खर्चात 15 ते 20 टक्क्यांनी घट होऊन याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

सामान्य नागरिकांना या निर्णयाचा काय आणि कसा फायदा?

ईव्ही बॅटरीच्या दरांमध्ये कपात होण्यामुळं आता इलेक्ट्रीक वाहनांच्या किमती पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत कमी होणार असून काही कारच्या किमती पेट्रोल- डिझेलच्या कारच्या किमतींसमान असतील. प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रीक स्कूटरचे दर 10 ते 20 हजारांनी कमी होऊ शकतात. तर, ईव्ही कारच्या किमती 1.5 लाख ते 2.5 लाखांनी कमी होऊ शकतात. आधीपासूनच ज्यांच्याकडे ईव्ही आहेत, त्यांच्यासाठीसुद्दा जुनी बॅटरी बदलणं नव्या बॅटरीच्या तुलनेत अधिक स्वस्त असेल.

रोजगार निर्मितीत मोलाचा वाटा…

केंद्र सरकारनं यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात ईव्ही बॅटरींवरील करात कपात केली नसून, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग  (ACC-PLI Scheme) साठी अतिरिक्त आर्थिक तरतुदीचीही व्यवस्था केली. ज्यामुळं येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणात बॅटली सेल बनवणारे कारखाने उभे राहणार असून, त्यामुळं परदेशी आणि प्रामुख्यानं चीनवरील निर्भरता कमी होणार आहे. इतकंच नव्हे, तर परदेशी मुद्रेची बचत होण्यासमवेत या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचेही संकेत मिळत आहेत. एकंदरच 2026 मधील अर्थसंकल्पामध्ये प्रदूषणमुक्त दळणवळणाच्या सोयी, स्वस्त प्रवासावर भर हेत देशात हरितक्रांतीला पुन्हा चालना दिली गेल्याचं लक्षात आलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!