Homeमनोरंजनइंडस्ट्रीज विरुद्ध एनझेड 5 वा सामना इशान किशनने शतक ठोकले हार्दिक पांड्याचे...

इंडस्ट्रीज विरुद्ध एनझेड 5 वा सामना इशान किशनने शतक ठोकले हार्दिक पांड्याचे सेलिब्रेशन व्हायरल


IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली गेली. यातील शेवटचा सामना हा तिरुअनंतपूरच्या स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला. 225 धावांवर न्यूझीलंडला ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज ईशान किशनने टी 20 आंतरराष्ट्रीयमधील त्याचं पहिलं शतक ठोकलं. हे शतक पूर्ण करताच ईशानने उत्साहात सेलिब्रेशन केलं, मात्र त्यापेक्षा सुद्धा हार्दिक पंड्याचा आनंद हा पाहण्यासारखा होता. त्याने उडी मारत थेट ईशानला मिठी मारली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तिरुअनंतपूरच्या स्टेडियमवर पाचव्या सामन्याचा टॉस हा भारताने जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडला आधी गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा या ईशान किशनने (103) ठोकल्या. तर सूर्यकुमार यादव (63), हार्दिक पंड्या (42), अभिषेक शर्मा (30) यांनी सुद्धा विस्फोटक खेळी केली. 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 विकेट गमावून 271 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स तर काइल जेमिसन, जेकब डफी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ईशान किशनचं पहिलं टी20 आंतरराष्ट्रीय शतक :

स्टार फलंदाज ईशान किशनने न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमधील पाचव्या सामन्यात पहिलं टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. ईशानने 42 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने 10 षटकार आणि 6 चौकार ठोकले. ईशानने एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोढीच्या गोलंदाजीवर एका ओव्हरमध्ये सर्व सहा बॉलवर ईशानने बाउंड्री टाकली. 28 बॉलमध्ये ईशानने अर्धशतक पूर्ण केलं. तर 42 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ईशान किशनला बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडिया स्थान मिळालं. न्यूझीलंड विरुद्ध टी २० सीरिजमध्ये त्याने मागच्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. तर शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात ईशानने थेट शतक ठोकून टी २० वर्ल्ड कपपूर्वी मोठी कामगिरी केली. ईशानच्या या शतकानंतर नॉन स्ट्राईक एंडवर असणाऱ्या हार्दिक पंड्याचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्याने थेट ईशानला घट्ट मिठी मारली. साधा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  टीम इंडियाने वर्ल्ड कप पूर्वी न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिज 4-1 ने आघाडी घेऊन जिंकली. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखीन वाढणार आहे.

भारताची प्लेईंग 11 :

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून...

0
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर...
spot_img

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
error: Content is protected !!